नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पालकांच्या विभक्त होण्याने लहान वयात मनात साचलेला पोरकेपणा आणि नैराश्याचा ताण अखेर एका निष्याप आणि अभ्यासात हुशार असलेल्या बालिकेच्या (Girl) जीवावर बेतला. कामठवाडे परिसरातील (Kamathwade Area) घोनी पार्कजवळ राहणाऱ्या कु. प्रणवी हर्षल आनेराव (१४) या बालिकेने रविवारी (दि. २६) रात्री घराच्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. अभ्यासात हुशार असलेल्या प्रणचीच्या या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कौटुंबिक कलहामुळे कोवळ्या मनावर होणाऱ्या गंभीर परिणामांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील वावरेनगर येथील रो हाऊस नंबर २/बी/३ येथे राहणारी प्रणवी रविवारी (दि. २६) रात्री ९ वाजेच्या सुमारास बरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेली होती. तिने फॅनच्या लोखंडी कडीला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर तिचे वडील हर्षल बाजीराव आनेराव यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गांगुर्डे यांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक संतोष संगम सखोल तपास करत आहेत. आई-वडिलांचे वाद किंवा घटस्फोट यांसारख्या घटनांचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोल व दीर्घकालीन परिणाम होतो. मुले अभ्यासात किंवा इतर गोष्टींत सामान्य दिसत असली, तरी त्यांच्या मनात टोकाचे नैराश्य साचलेले असू शकते. अशा मुलांशी पालकांनी सतत संवाद साधणे, त्यांचे मन मोकळे करणे आणि गरज पडल्यास बालमानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.
नेमके कारण अस्पष्ट
प्रणवीने रविवारी रात्री अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले, तिला काही मानसिक त्रास होता का किंवा काही चिठ्ठी लिहून तेवली आहे का, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आकस्मिक मृत्यूच्या तपासादङ्ख्यान पोलीस तिच्या कुटुंबातील सदस्य, मैत्रिणी व शाळेतील शिक्षकांकडे (Teachers) विचारपूस करून पुढील सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मातेची ताटातूट, नैराश्य
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी प्रणवीच्या आईने कायदेशीर प्रक्रियेद्वारे फारकत घेतली होती. आई-वडिलांच्या या विभक्त होण्याचा प्रणवीच्या बालमनावर परिणाम झाला होता. तेव्हापासूनच ती मानसिक नैराश्यात होती, असे समोर आले आहे. प्रणवी अभ्यासात अत्यंत हुशार होती. मात्र, बाहेरील जगाला तिची बुद्धिमत्ता दिसत असताना आतून मात्र ती आईच्या दूसव्यामुळे एकाकीपणाशी झुंज देत होती. सध्या तिचे वडील कुरिअर व इतर व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात आणि तिची सावत्र आई तिचा सांभाळ करत होती. तिला दीड वर्षाचा सावत्र भाऊ आहे.




