Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : एमडीनंतर 'ॲम्फेटामाईन'ची एन्ट्री; दाेन कोटी ३५ लाखांच्या अंमली...

Nashik Crime News : एमडीनंतर ‘ॲम्फेटामाईन’ची एन्ट्री; दाेन कोटी ३५ लाखांच्या अंमली पदार्थांसह १८२ डिलर, पेडलर्स गजाआड

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहराला ड्रग्जच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी शहर पोलिसांनी (City Police) अंमली पदार्थ तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. गेल्या अडीच वर्षांत पोलिसांच्या कारवाईचा आलेख उंचावला असून, ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय बाजारात ‘पार्टी ड्रग्ज’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या ‘ॲम्फेटामाईन’ या नव्या घातक ड्रग्जची (MD Durgs) नाशिकमध्ये एन्ट्री झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

शहरात वर्ष २०२४ ते २०२६ (आजपावेतो) या कालावधीत पाेलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशाने गुन्हेशाखा व एनडीपीएस पथकाने एकूण ८४ गुन्हे दाखल करत १८२ संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ३५ लाख १० हजार २८१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चालू वर्ष २०२६ (जानेवारी ते आजपावेतो) पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि तितकेच यशस्वी ठरले आहे. अवघ्या सहा महिन्यांत पोलिसांनी १९ कारवाया करत थेट १ कोटी २१ लाख ६४ हजार २३० रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून ३८ आरोपींना गजाआड केले आहे. या सहा महिन्यांतील मुख्य कारवाई म्हणजे कुप्रसिद्ध ‘पार्टी ड्रग्ज’ अॅम्फेटामाईन.

पोलिसांनी (Police) २४ लाख ३५ हजार रुपये किमतीचे ४८७ ग्रॅम ॲम्फेटामाईन हस्तगत करत ३ तस्करांचे नेटवर्क उद्ध्वस्त केले. याशिवाय याच ६ महिन्यांत एमडीच्या १२ केसेसमध्ये ५५९ ग्रॅम ३९८ मिली साठा (किंमत ७१.७१ लाख) जप्त करून २४ संशयितांना तर गांजाच्या ३ केसेसमध्ये ३७ किलो ४३६ ग्रॅम साठ्यासह (किंमत १२.७८ लाख) ८ जणांना अटक केली आहे. तसेच २४९ ग्रॅम भांग जप्त करत ३ जणांवर कारवाई करण्यात आली.  शहर पोलिसांनी सर्व आरोपींवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून, शहरात ‘पार्टी ड्रग्ज’ सप्लाय करणाऱ्या टोळीचा शोध सुरू आहे.

मागील दोन वर्षांतील कारवाया नजर

​वर्ष २०२४

या वर्षात एकूण २७ केसेस नोंदवून ६० आरोपींना अटक झाली. ५९ लाख ७९ हजार ६६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ११ केसेस एमडीच्या (४४६.०४ ग्रॅम, किंमत २१.०२ लाख) आणि १६ केसेस गांजाच्या (२६८ किलो ५३९ ग्रॅम, किंमत ३८.७७ लाख) होत्या.

वर्ष २०२५

या वर्षात कारवायांचा वेग वाढला. एकूण ३८ केसेसमध्ये ८४ आरोपींना अटक झाली आणि ५३ लाख ६६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. यात एमडीच्या २३ केसेस (४९३ ग्रॅम, किंमत ४०.४२ लाख), गांजाच्या ११ केसेस (५५ किलो ३४४ ग्रॅम, किंमत १०.१५ लाख), चरसची १ केस (४९ ग्रॅम, किंमत २४,५०० रू) आणि भांगच्या ३ केसेसचा (२८० किलो ३९६ ग्रॅम, किंमत २.८३ लाख) समावेश होता.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...