नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेट बँकेच्या (State Bank) ऋगवेद शाखेतून २५ लाख रुपयांची चोरी (theft) झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
बँकेचे (Bank) कामकाज शुक्रवारी संध्याकाळी आटोपल्यानंतर स्ट्राँग रूम बंद करण्यात आला होता. परंतु कॅशियरने ५०० रुपयांचे पाच बंडल चुकून स्ट्रांग रूम बाहेरील लोखंडी कपाटात ठेवले. शनिवारी आणि रविवारी बँक बंद असल्याने सोमवारी अधिकारी व कर्मचारी बँकेत आले तेव्हा लोखंडी कपाट व एका खिडकीचा गज तुटलेला आढळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी व्यक्ती खिडकीचा गज तोडून बँकेत प्रवेश करताना दिसला आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला आला समोर; पाहा कुणाच्या वाट्याला किती जागा?
दरम्यान, चोरी झालेल्या रकमेची (Money) मोजणी करताना २५ लाखांची कमतरता लक्षात आल्यावर स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक सुरेश दत्तात्रेय बोऱ्हाडे यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध उपनगर पोलिसात (Upnagar Police) तक्रार दाखल केली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, साहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत. घटनास्थळाच्या सर्व बाबींचा अभ्यास केला जात आहे. या चोरीच्या घटनेने बँक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा