Sunday, August 16, 2026
Homeक्राईम​Nashik Crime News : परिमंडळ दाेनमधून ५२ सराईत हद्दपार; सण-उत्सवांच्या तोंडावर नाशिक...

​Nashik Crime News : परिमंडळ दाेनमधून ५२ सराईत हद्दपार; सण-उत्सवांच्या तोंडावर नाशिक पोलिसांचा ‘स्ट्राइक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आगामी सण-उत्सवांच्या काळात शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या असामाजिक तत्त्वांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार, परिमंडळ दाेनच्या कार्यक्षेत्रातील तब्बल ५२ सराईत गुन्हेगारांवर एकाच वेळी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

​परिमंडळ दाेनचे पोलीस उपआयुक्त किशोर काळे यांनी विभागातील विविध पोलीस ठाण्यांकडून (Police Station) आलेले हद्दपारीचे प्रस्ताव तपासून ही अंतिम कारवाई केली. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये या सर्व ५२ गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्याचे कायदेशीर आदेश जारी करण्यात आले आहेत. “ज्यांच्यावर दोन किंवा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि जे सातत्याने उपद्रव माजवत आहेत, अशांना शहरात स्थान नाही.

सण-उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी ही तर फक्त सुरुवात आहे. अजूनही अनेक संशयितांचे प्रस्ताव चौकशीत आहेत. याशिवाय संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर ‘मोक्का’ (MCOCA) आणि ‘एमपीडीए’ (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली जाईल., असे पाेलिसांनी स्पष्ट केले आहे. उपनगर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीतील गुन्हेगारांवर सर्वाधिक गाज पडल्याचे दिसून येत आहे.

पोलीस ठाणे हद्दपार करण्यात आलेले संशयित

उपनगर – १८
इंदिरानगर – ०८
सातपूर – ०७
देवळाली कॅम्प – ०७
अंबड- ०५
नाशिकरोड – ०४
एमआयडीसी (चुंचाळे) – ०३
एकूण – ५२

ताज्या बातम्या