Thursday, November 5, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गुन्हे शाखेच्या बॅरक १५ मध्ये धुमाकूळ! सराईताची मुजोरी,...

Nashik Crime News : गुन्हे शाखेच्या बॅरक १५ मध्ये धुमाकूळ! सराईताची मुजोरी, सरकारी मालमत्तेची तोडफोड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात (Crime Branch Office) चौकशीसाठी आणलेल्या एका सराईत संशयिताने धुमाकूळ घालत तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालमत्तेच्या गुन्ह्यात चौकशी सुरू असताना संशयिताने थेट कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देत कार्यालयातील काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

​मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या बॅरक नंबर १५ मध्ये हा प्रकार घडला. गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार चारुदत्त विजय निकम व पोलीस उपनिरीक्षक पाटील हे एका मालमत्तेच्या गुन्ह्याप्रकरणी भारतनगर झोपडपट्टीतील संशयित नाझिम शेख याची चौकशी करत होते. चौकशी सुरू असतानाच नाझिम अचानक आक्रमक झाला. त्याने आरडाओरडा करत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्यास सुरवात केली.

यानंतर, संशयिताने (Suspected) हातातील लोखंडी कड्याने थेट कार्यालयाच्या भिंतीवर लावलेली काच फोडली आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी अंमलदार चारुदत्त निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित नाझिम शेख याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३२, ३५१(२), ३५२ आणि ३२४(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.

ताज्या बातम्या

Satej Patil : “सरकारने कोल्हापूरकरांचा अपमान केला, ९ तारखेला…”; सतेज पाटलांची...

0
कोल्हापूर | Kolhapur कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरून राजकारण चांगलेच तापले आहे. गोकुळमध्ये (Gokul Milk) महायुतीची (Mahayuti) सत्ता आणण्यासाठी...