Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik News : नाशिकरोड कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रंगली मद्यपार्टी; संशयित आरोपीच्या उपस्थितीने...

Nashik News : नाशिकरोड कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रंगली मद्यपार्टी; संशयित आरोपीच्या उपस्थितीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

नाशिक | Nashik

नाशिकरोड परिसरातील (Nashik Road Area) कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाबाहेर रात्री उशिरापर्यंत मद्यपार्टी रंगल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पार्टीत एका संशयित (Suspected) आरोपीची उपस्थिती असल्याची चर्चा परिसरात रंगू लागल्याने पोलिसांच्या (Police) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी काही जणांकडून खुलेआम मद्यसेवन करण्यात येत होते. परिसरातील नागरिकांनी (Citizen) याबाबत नाराजी व्यक्त करत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. कारागृह अधिकाऱ्यांच्या निवासस्थानालगत अशा प्रकारे मद्यपार्टी होणे आणि त्यात संशयित आरोपी सहभागी असल्याची बाब गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनाच्या गस्त, देखरेख आणि कारवाईबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, संबंधित संशयित आरोपी त्या ठिकाणी कसा पोहोचला, त्याची उपस्थिती नेमकी कोणाच्या माध्यमातून होती, तसेच यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी (Demand) जोर धरू लागली आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...