Saturday, November 14, 2026
Homeक्राईम​Nashik Crime News : गोविंदनगरमध्ये थरारक घटना; पकडल्या गेलेल्या चोराचा हवालदारावर हल्ला

​Nashik Crime News : गोविंदनगरमध्ये थरारक घटना; पकडल्या गेलेल्या चोराचा हवालदारावर हल्ला

स्वतःच्या मानेवरही करुन घेतले वार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गोविंदनगर परिसरातील (Govindnagar Area) पाईनवूड अपार्टमेंटमध्ये चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एका सराईत चोराने पोलिसांना (Police) हुलकावणी देण्यासाठी व स्वतःच्या बचावासाठी पोलिसांच्या दिशेने कुलूप फेकून मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हाती लागल्यास कारवाई टाळण्यासाठी या चोराने स्वतःच्याच चाकूने मानेवर आणि हातांवर वार करून स्वतःला जखमी करून घेतल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गाेरखसिंग गागासिंग टाक (वय ४०, रा. हडपसर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.  

- Advertisement -

​पोलिसांच्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गोविंदनगर येथील पाईनवूड अपार्टमेंटमधील रुम नंबर सातचे कुलूप तोडून टाक याने घरात प्रवेश केला होता. यादरम्यान डायल ११२ वरुन पाेलिसांना चाेरट्यांची माहिती मिळाली. यानंतर, फिर्यादी हवालदार शिवाजी वाघूजी शिरसाठ (वय ५२, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) हे व अमलदार तिथे पोहोचले. पाेलीस आल्याचे पाहून टाक याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिरसाठ यांनी त्याला पकडण्याचा (Caught) प्रयत्न केला असता, टाकने हातातील कुलूप त्यांच्या अंगावर फेकून मारले. यात ते जखमी झाले. यानंतर पोलिसांनी टाकचा सामना करुन त्याला पकडले. याचवेळी त्याने, आपण पाेलिसांच्या तावडीत सापडलाे म्हणूण भीतीपोटी चाकू उगारत स्वतःच्याच दोन्ही हातावर व मानेवर वार करून स्वतःला जखमी करून घेतले आणि पोलिसांनाच गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला.  

​मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा

​या प्रकरणी फिर्यादी हवालदार शिवाजी शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ), १३२, २२६, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास श्रेणी उपनिरीक्षक रोहिदास सोनार हे करीत आहेत. चोरीच्या उद्देशाने घरात घुसून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणे आणि स्वतःलाच जखमी करून पोलिसांवरच दबाव तंत्राचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात चर्चा रंगली हाेती.

टाकचा पूर्वाेइतिहास

सप्टेंबर २०२४ मध्ये राका कॉलनीत माजी नगरसेविका डाॅ. ममता पाटील यांच्या घरात घरफोडी करून सुमारे एक किलो सोन्याचे दागिने आणि परकीय चलन चोरून नेल्याप्रकरणी टाकसह तिघांना अटक झाली हाेती. टाकवर घरफोडी, चोरीचे सुमारे ४३ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गोरखसिंग टाक हा पुण्यातील रहिवासी असून त्याची बहिण गंजमाळ भागात वास्तव्याय आहे. ताे तिच्याकडे कायम मुक्कामी असताे व नाशिकमध्ये चाेरी व घरफाेडी करताे. त्याचा साथीदार अमनसिंग टाकविरोधात पंचवटी, सायखेडा व इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे चारहून अधिक गुन्हे दाखल आहेत. 

ताज्या बातम्या

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरण चर्चांना पूर्णविराम! सुप्रिया सुळेंची पत्रकार...

0
मुंबई | Mumbai गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार का? या...