वावी | वार्ताहर | Vavi
सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) दोडी बु. येथे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) नारळाच्या बागेतील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता मधुकर जाधव रा. दोडी बु. असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात व्यक्तींनी तिचा गळा आवळून व पाय बांधून विहिरीत फेकून खून केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी दिली आहे.
संगीता यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी ७ ऑगस्ट रोजी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल बंद (Mobile Close) असल्याने नातेवाईकांनी त्यांचा मुलगा सुरज जाधव याला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. घरी कुलूप असल्याचे आढळल्यानंतर परिसरात शोध घेण्यात आला. त्यानंतर ८ ऑगस्टला नांदूर शिंगोटे पोलीस चौकीत (Shingote Police Chowki) त्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. रविवारी (दि.९) नातेवाईकांनी दोडी बु. परिसरात त्यांचा शोध सुरू केला.
ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. नारळाच्या बागेतील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळून त्यानंतर म्हाळोबा मंदिर रस्त्यालगत शेळ्या चारणाऱ्या काही व्यक्तींना संगीता यांचा फोटो दाखवून चौकशी करण्यात आली. त्यांनी सदर महिला परिसरात दिसल्याचे व काही दिवसांपूर्वी काही लोकांनी तिला घेऊन गेल्याचे सांगितले. दरम्यान, संगीता यांचा मुलगा सुरज आणि त्याची पत्नी परिसरात शोध घेत असताना आला. पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मृतदेह संगीता यांचा असल्याची ओळख नातेवाईकांनी पटविली.
मृतदेहाच्या गळ्याला काळ्या रंगाच्या साडीने गाठ मारलेली होती व त्याच साडीने पाय बांधलेले दिसून आले. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्यापूर्वीच्या कालावधीत अज्ञात आरोपींनी संगीता जाधव यांना सोबत नेऊन गळा आवळून त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत (Well) फेकून दिल्याची फिर्याद संगिता यांच्या बहिण सुनिता दत्तात्रय वाकचौरे (५०) रा. पिंपळवाडी ता. रा-हता यांनी दिली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




