Friday, July 24, 2026
Homeक्राईमNashik Crime : ऑरा बार गोळीबार प्रकरणातील आणखी एक संशयित ताब्यात

Nashik Crime : ऑरा बार गोळीबार प्रकरणातील आणखी एक संशयित ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर येथील ऑरा बार गोळीबार (Aura Bar Firing Case) प्रकरणातील संशयिताला अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने (Ambad Crime Branch) गौळाणे रोड, पाथर्डी गाव येथे सापळा रचून ताब्यात घेतले.

- Advertisement -

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबादित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात (Nashik CP Office) अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला पाहिजे व फरार संशयितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पोलीस नाईक भूषण सोनवणे, अंमलदार चारूदत्त निकम व भगवान जाधव यांना सातपूर ऑरा बार गोळीबार प्रकरणातील संशयित शुभम निकम हा नाशिक मध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

दरम्यान, यानंतर त्यांनी सदरहू माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गौळाणे रोड, पाथर्डी गाव येथे सापळा रचून संशयित शुभम चंद्रकांत निकम (वय २५ वर्षे, रा. कृष्णा प्राईड सोसायटी रुम नं ३०६ गौळाणे रोड, पाथर्डी गाव, नाशिक) यास ताब्यात घेतले. पुढील तपासकामी सातपूर पोलिसांच्या (Satpur Police) ताब्यात दिले.

ताज्या बातम्या

सायखेडा

Nashik News: गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सायखेडा, चांदोरी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

0
चांदोरी | वार्ताहरनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सायखेड्याच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे...