Tuesday, October 20, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणीत वाढ; तर पत्नीला सशर्त जामीन

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या अडचणीत वाढ; तर पत्नीला सशर्त जामीन

मनी ट्रेल प्रकरणी विशेष न्यायालयाचा दणका; कल्पनाला विदेश प्रवासावर बंदी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दैवी शक्ती व भविष्यवाणीच्या नावाखाली भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण, तसेच तब्बल ४२ कोटी ८८ लाख रुपयांची आर्थिक लूट केल्याप्रकरणात कॅप्टन खरातच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) मुंबईच्या विशेष न्यायालयाने (Court) वाढ केली आहे, तर त्याची पत्नी कल्पना खरातला परदेश प्रवासबंदीसह अटी-शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

- Advertisement -

शर्ती

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात तीन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. मंगळवारी (दि. २२) झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबईतील (Mumbai) विशेष पीएमएलए न्यायालयाने कल्पना खरात हिला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाने तिच्यावर कडक निर्बंध लादले आहेत. खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला आणि ईडीच्या तपासादरम्यान बोलावल्यावर प्रत्यक्ष हजेरी अनिवार्य असून साक्षीदारांवर दबाव न आणणे आणि पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याची ताकीद दिली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात खरात दाम्पत्यासह संशयित अरविंद बावके, नामकर्ण आवारे, अविनाश कांडेकर व मिलिंद बनकर हेदेखील संशयित आहेत. मंगळवारच्या सुनावणीस (Hearing) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून अशोक खरात (Ashok Kharat) याला व्हीसी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे हजर करण्यात आले, तर कल्पना खरात प्रत्यक्ष हजर होती. उर्वरित संशयित अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत ६ ऑक्टोबर रोजी सर्व संशयितांना कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पीएमएलएचा विळखा

अशोक खरातविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) २५ मार्च रोजी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याआधारे ईडीने ६ एप्रिल रोजी पीएमएलए (मनी लाँड्रिंग) कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपासाचा फास आवळला. खरातवर नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि राहता येथे मिळून तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, नाशिक न्यायालयात (Nashik Court) दाखल एका गुन्ह्यातील त्याच्या जामीन अर्जावर ३० सप्टेंबर रोजी सुनावणी (Hearing) होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचार्‍याची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar रयत शिक्षण संस्थेचे कर्मचारी भाऊसाहेब ऊर्फ राजनारायण दत्तात्रय पांडुळे (वय 52, रा. सारसनगर, अहिल्यानगर) यांनी अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील केडगाव शिवारातील नील हॉटेलच्या खोलीत...