Saturday, September 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime News : केस मागे घे, नाहीतर मारून टाकू; ​नाशिकरोड कारागृहातूनच...

Nashik Crime News : केस मागे घे, नाहीतर मारून टाकू; ​नाशिकरोड कारागृहातूनच पाटणकर टोळीच्या सुपाऱ्या

पंचवटीत पूर्वश्रमीच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील गुन्हेगारीचे जाळे कारागृहाच्या भिंतींमागेही सुरक्षित असल्याचा प्रकार समोर आला आहे. शरणपूर रोड परिसरातील (Sharanpur Road Area) सराईत गुंड हर्षद पाटणकर हा गेल्या चार महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Jail) गजाआड असतानाही, तेथूनच त्याची गुन्हेगारी सूत्रे हलत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पूर्वीचा साथीदार आणि सध्याचा विरोधक असलेल्या एका सराईतावर दाखल फिर्याद मागे घेण्यासाठी पाटणकरच्या सांगण्यावरून त्याच्या दोन साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) पाटणकरसह त्याच्या दोन साथीदारांवर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

​मिळालेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ रोजी पंचवटीतील मोरे मळा परिसरात सराईत गुंड निलेश नंदू रणमाळे (वय ३०, रा. श्रीरामनगर, रामवाडी, पंचवटी) याच्यावर हर्षद पाटणकर आणि त्याच्या टोळीने प्राणघातक हल्ला चढवून गोळीबाराचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी रणमाळे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यासह अन्य गंभीर गुन्ह्यात पसार असलेल्या हर्षद पाटणकर (रा. शरणपूर रोड) याला चार महिन्यांपूर्वी युनिट एकने (Unit One) गुजरातमधून अटक करून नाशिकरोड कारागृहात रवानगी केली हाेती. दाखल फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निलेश रणमाळे हा घरी असताना संशयित तन्मय कलकुंडे याने त्याला फोन केला. “भाईचा मेसेज आहे की, तू केस मागे घे आणि ॲफिडेव्हिट करून दे, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू,” अशी धमकी दिली.

त्यानंतर लगेचच दुसरा संशयित आदित्य नामदेव लष्करे याने त्याच्या ‘aadu_15’ या इन्स्टाग्राम आयडीवरून रणमाळेला कॉल केला. “तुला आता तन्मयने सांगितले ते समजत नाही वाटतं… आम्ही तर जेलमध्ये जाऊच, पण तुला मारून टाकू!” असा दम भरला. विशेष म्हणजे लष्करे व कलकुंडे हे, काही दिवसांपूर्वीच हर्षद पाटणकरला भेटण्यासाठी नाशिकराेड कारागृहात जाऊन आले आहेत, असे तपासात समाेर आले आहे. आता निलेश रणमाळे याने रविवारी (दि. २) पंचवटी पोलिस ठाणे गाठून फिर्याद (FIR) दिली. त्यानुसार, साक्षीदारास धमकाल्याचा गुन्हा (Case) नाेंद झााल असून उपनिरीक्षक सचिन चव्हाण तपास करत आहेत. 

जेलमधून कसे चालते नेटवर्क

गंभीर गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेला हर्षद पाटणकर तेथून बाहेर स्वतःच्या टोळीला थेट आदेश कसे देतो? कारागृहातून निरोप बाहेर पोहचतातच कसे? असे गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. शहरातील गँगवॉर मोडून काढण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर असताना, जेलमधूनच धमक्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसिंग आणि कारागृह प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुद्दे

-फिर्यादी रणमाळे हा पूर्वी पाटणकर टोळीचाच सक्रिय सदस्य होता. मात्र, वर्चस्ववादातून त्यांच्यात वितुष्ट आले.
-पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी गुन्हेगारांकडून आता ‘इन्स्टाग्राम कॉलिंग’चा वापर
-संशयित हर्षद पाटणकर याच्यावर शहर आणि परिसरात ९ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे
-आता पंचवटी पाेलिस तन्मय व आदित्यला ताब्यात घेणार
-हर्षद पाटणकरची हाेणार पुन्हा चाैकशी

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : दुष्काळावर मात करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न – CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी...