Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik Trimbakeshwar Darshan Scam : विश्वस्त कडलगचा जामीन रखडला; पुतणेही...

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : विश्वस्त कडलगचा जामीन रखडला; पुतणेही अर्ज करणार

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन घोटाळ्यातील (Trimbakeshwar Darshan Scam) मुख्य संशयित विश्वस्त पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) याच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवार (दि. १८ मे) रोजी होणार आहे. नाशिक सत्र न्यायालयात सोमवारी (दि. ११) यावर सुनावणी अपेक्षित होती; मात्र पोलिसांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितल्याने हा निर्णय रखडला. सध्या कडलगसह पाचही संशयित नाशिकरोड कारागृहात (Nashik Road Jail) आहेत.

- Advertisement -

​पंचवटीतील (Panchvati) आनंदा मेहेंदळे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित पुरुषोत्तम कडलग, अभिषेक कडलग, ओम कडलग, गोटीराम पेहरे आणि मध्यस्थी नारायण मुर्तडक यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी केलेल्या तपासात लाखो रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला आहे. हे संशयित भाविकांकडून २ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळून अवघ्या १५ मिनिटांत ‘व्हीआयपी’ दर्शन घडवून आणत असत.

दरम्यान, मुर्तडक हा या टोळीचा (Gang) प्रमुख मध्यस्थी असून त्याचे सात साथीदार देशभरातील भाविकांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ​संशयित ओम आणि अभिषेक कडलग यांचे जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने (Court) फेटाळल्याने ते आता सत्र न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

विश्वस्तांची अफवा

दर्शन घोटाळा प्रकरणात मंदिराचे आणखी दोन विश्वस्त पोलिसांच्या (Police) रडारवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. तपासात अद्याप इतर कोणत्याही विश्वस्ताचा सहभाग निष्पन्न झालेला नाही किंवा कोणालाही नव्याने अटक केलेली नाही. त्यामुळे दोन विश्वस्तांना अटक होणार ही निव्वळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...