Saturday, November 7, 2026
HomeनाशिकNida Khan Case : माजी खासदार-नगरसेवकासह ११ जणांवर खटला; न्यायालयात नव्या संशयितांविरुद्ध...

Nida Khan Case : माजी खासदार-नगरसेवकासह ११ जणांवर खटला; न्यायालयात नव्या संशयितांविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टीसीएस कंपनीतील (TCS Company) तरुणीचा विनयभंग, अत्याचार व धर्मांतराच्या देवळाली कँम्प पाेलिसांत (Deolali Camp Police Station) दाखल गुन्ह्यात संशयितांची संख्या अकरा झाली आहे. त्यात सर्वाधिक संशयित कंपनीची तत्कालिन कर्मचारी निदा खानसह तिचे कुटुंब व नातलग असून तिच्यामुळे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याही अडचणीत वाढ झाली आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात या गुन्ह्याशी (Case) संबंधित नवीन संशयित ५ ते ११ यांच्याविरुद्ध एसआयटीने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील एकूण संशयितांची संख्या अकरावर पोहोचली आहे. न्यायालयाकडून या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर राेजी निश्चित केली आहे. या प्रकरणात तपासादरम्यान, एसआयटीने सखोल तपास करत तांत्रिक विश्लेषण, काॅल डिटेल्स, आणि इतर फॉरेन्सिक अहवाल प्राप्त केले आहेत.

हे देखील वाचा : Nashik TCS Case : निदा खानला आश्रय देणे भोवले; AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील सहआरोपी

या ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा सहभाग निष्पन्न करत न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र सादर केले. दोन महिन्यांपूर्वीच नाशिक एसआयटीचे प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) यांनी या प्रकरणासंदर्भात जलील यांना नाेटीस बजावून चौकशी केली होती व जबाब नाेंदविला हाेता. आता न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्याने या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले असून १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

ताज्या बातम्या

वेळापत्रक

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! फेब्रुवारीत बोर्डाचा बिगुल; प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही...

0
पुणे | Puneमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या...