Sunday, October 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ​मद्यधुंद तरुणाचा पोलिसांवर हल्ला; गुन्हा दाखल

Nashik Crime News : ​मद्यधुंद तरुणाचा पोलिसांवर हल्ला; गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कॉलेज रोडवरील (College Road) डिसूझा कॉलनी परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असणाऱ्या ‘नाइटलाईफ’ आणि अनधिकृत पार्ट्यांचा फटका स्थानिक नागरिकांना (Citizen) बसला आहे. सोमवारी (दि. ३) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने रस्त्यावर जोरदार राडा घालत गस्तीवर असलेल्या पोलिसांवरच हल्ला चढवून धक्काबुक्की केली. या घटनेमुळे कॉलेज रोड परिसरातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या आणि त्यामुळे उडणाऱ्या गाेंधळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोहित विनायक आढाव (वय २८, रा. आढाव मळा, गुरुदत्तनगर, जेलरोड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.

- Advertisement -

​गंगापूर पोलिसांचे (Gangapur Police) ‘डीबी मोबाईल’ पथक सोमवारी पहाटेच्या सुमारास परिसरात गस्त करत असताना डिसूझा कॉलनीतील एका मद्य दुकानाबाहेर त्यांना गर्दी दिसून आली. त्या ठिकाणी संशयित रोहित आढाव मद्यधुंद अवस्थेत आरडाओरड करत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला रस्त्यावरून बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्याने “मी पोलिसांना घाबरत नाही, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” असे ओरडत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अंमलदार घन:श्याम प्रकाश भोये व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी (Police) बळाचा वापर करत त्याला ताब्यात घेतले. जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याने अतिमद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत आढाववर शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांना धक्काबुक्की करणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​’सरप्राइज चेकिंग’ अन् कठोर कारवाईची मागणी

​यापूर्वीही पोलिसांनी या भागात अनेकदा कारवाया केल्या आहेत, परंतु त्या ताेकड्या ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता गंगापूर पोलिसांनी या परिसरात नियमित गस्त वाढवावी, रात्री उशिरापर्यंत उघड्या राहणाऱ्या आस्थापनांवर थेट गुन्हे दाखल करावेत आणि सरप्राइज चेकिंग मोहीम राबवावी, अशी मागणी त्रस्त रहिवाशांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...