Wednesday, September 30, 2026
Homeक्राईमNashik Crime News : देवळाली कॅन्टोन्मेंटच्या माजी सीईओवर गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

Nashik Crime News : देवळाली कॅन्टोन्मेंटच्या माजी सीईओवर गुन्हा; नेमकं प्रकरण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे (Deolali Cantonment Board) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि २०१२ च्या बॅचचे आयडीईएस अधिकारी संशयित अजय कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने (CBI) बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा (Case) दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे, या गुन्ह्यात केवळ अधिकारीच नव्हे, तर त्यांच्या या बेकायदेशीर उत्पन्नात त्यांना प्रत्यक्ष साथ देणाऱ्या आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या पत्नी संशयित स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनाही सीबीआयने सहसंशयित केले आहे.

- Advertisement -

याप्रकरणात संशयित (Suspected) अधिकाऱ्याच्या संपत्तीवाढीचा वेग आणि खर्चाचा ताळमेळ धक्कादायक आहे. सीबीआयच्या तपासात (१ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४) अजय कुमार यांची कायदेशीर कमाई ५ कोटी ४ लाख रुपये एवढी होती. मात्र, याच काळात त्यांनी तब्बल ५ कोटी १७ लाख रुपये खर्च केले. म्हणजेच त्यांची अधिकृत बचत फक्त १३ लाख ६४ हजार रुपये होती. असे असतानाही, त्यांच्याकडे तब्बल ५ कोटी ७२ लाख रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. याबाबत कोणताही कायदेशीर स्त्रोत ते दाखवू शकलेले नाहीत.

कुटुंबाचा सहभाग

काळा पैसा आणि संपत्ती लपवण्यासाठी किंवा हस्तांतरित करण्यासाठी पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनी मदत केल्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम १०९ (गुन्ह्यास प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. तसेच तपास कालावधीच्या सुरुवातीला या अधिकाऱ्याची एकूण मालमत्ता केवळ ५२,४२८ रुपये होती, जी तपास संपेपर्यंत तब्बल ५ कोटी ५९ लाख ६७ हजार रुपयांवर पोहोचली.

सीबीआय तपासातील मालमत्तेचा ताळेबंद

तपशील रक्कम (रुपयांमध्ये)

तपास कालावधीपूर्वीची एकूण संपत्ती – ५२,४२८.५६
तपास कालावधीच्या अखेरची संपत्ती – ५,५९,६७,८१५.००
तपास कालावधीतील अधिकृत उत्पन्न – ५,०४,२८,९२४.००
तपास कालावधीतील एकूण खर्च – ५,१७,९३,०४४.००
संभाव्य बचत – १३,६४,१२०.००
एकूण बेहिशोबी मालमत्ता – ५,७२,७९,५०६.४४

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 350 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3653 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...