पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
म्हसरूळ परिसरातील (Mhasrula Area) निसर्गनगर भागात एका ३२ वर्षीय महिलेच्या (Woman) घरात घुसून तिचा विनयभंग व मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयिताने स्वतःला पोलीस (Police) असल्याचे सांगत धमकी दिल्याचा आरोप असून, म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २२ मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला व तिची आई (Mother) घरात असताना संशयित गणेश पंडित हादगे (रा. सिडको, नाशिक) हा घरात शिरला. फिर्यादीनुसार, संशयिताने महिलेशी अश्लील वर्तन करत शरीरसुखाची मागणी केली. महिलेने विरोध केल्यानंतर त्याने तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान यावेळी महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिला चापट मारून मारहाण केली. तसेच तिचे कपडे फाडून लज्जास्पद कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर संशयिताने, “मी पोलीस आहे, माझे कोणी काहीही बिघडवू शकत नाही,” अशी धमकी देत तेथून पळ काढल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेश पंडित हादगे याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार टी. जी. बाराईत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




