Thursday, June 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल; दोघांवर गुन्हा

Nashik Crime News : बदनामीकारक व्हिडिओ व्हायरल; दोघांवर गुन्हा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

भांडणाचे जुने व्हिडिओ (Old Video) बदनामी व्हावी या उद्देशाने सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) कपालेश्वर संस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष अक्षय कलंत्री तसेच अजिंक्य गीते यांच्याविरुद्ध अदखल गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

कपालेश्वर मंदिराचे पुजारी हेमंत पद्माकर गाडे यांच्या तक्रारीनुसार, अजिंक्य गीते व अक्षय कलंत्री यांनी तक्रारदार यांच्या पूर्वी झालेल्या जुन्या भांडणाचे व्हिडिओ रात्री उशीरा फेसबुकवर टाकले ते व्हिडिओ सकाळी तक्रारदार यांनी त्याचे फेसबुकवर पाहीले असता विरोधक यांनी टाकलेले व्हिडीओ हे जुने असून तक्रारदार यांची समाजामधे बदनामी व्हावी या उद्देशाने व्हिडिओ फेसबुकवर (Facebook) टाकून तक्रारदार यांची बदनामी केली असे नमूद केले आहे.

श्री कपालेश्वर मंदिरातील वर्तनावर प्रश्नचिन्ह

श्री कपालेश्वर मंदिर (Kapaleshwar Temple) हे आस्था आणि भक्तीचे प्रमुख केंद्र मानले जाते. या मंदिरात नाशिक शहरासह राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, मंदिरातील काही पुजाऱ्यांकडून भक्तांशी असभ्य वर्तन केल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या असून त्या नाशिककरांना परिचित आहेत. दरम्यान, अशाच प्रकारची आणखी एक घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

आमचा या प्रकारणांशी कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. सदर घटनेबाबत मला कोणतीही अधिकृत किंवा सविस्तर माहिती उपलब्ध नाही. हा संपूर्ण प्रकार पुजारी आणि भक्त यांच्यामधील वैयक्तिक स्वरूपाचा वाद असल्याचे समजते. तथापि, अशा प्रकारच्या अंतर्गत वादामुळे मंदिराच्या पवित्रतेवर तसेच त्याच्या सामाजिक आणि धार्मिक प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होत आहे. मंदिर हे श्रद्धेचे आणि एकात्मतेचे प्रतीक असताना अशा वादांमुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

विलास पाटील, प्रशासक, धर्मदाय आयुक्त विभाग

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरातील गुन्ह्यात चेअरमन कुटेसह 10 संचालकांना अटक

0
श्रीरामपूर, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Shrirampur, Ahilyanagar बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात 10 जणांना...