Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : अन् बाळचोरीचा महिलेचा डाव फसला; सावध आजी, आईमुळे टळला...

Nashik News : अन् बाळचोरीचा महिलेचा डाव फसला; सावध आजी, आईमुळे टळला अनर्थ

नाशिक| प्रतिनिधी | Nashik

देवळाली कॅम्प हद्दीत सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या गर्दीतून सव्वा वर्षांचे बाळ चोरून (Child Abduction) पळवून नेण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून, आजीच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला आहे. बीड जिल्ह्यातील सराईत असलेल्या महिलेने बाळाला आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळाच्या आजी व आईने सतर्कता दाखवत क्षणार्धात बाळाची सुटका केली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी महिलेला (Women) रंगेहाथ पकडून चोप देत देवळाली कॅम्प पोलिसांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -

लक्ष्मी नागनाथ दुबळे (वय ४०, रा. गांधीनगर, नाळवंडी नाका, जि. बीड) असे संशयित महिलेचे नाव आहे. ही घटना दि. २५ डिसेंबरला दुपारी २ वाजता भगूर-घोटी रोडवरील लहवितजवळील वाडीमळा येथे घडली. दुबळे हिने परिसरातील एका १६ महिन्यांच्या बाळाला हेरले व नातलगांची नजर चुकवून बाळाला उचलण्याचा प्रयत्न मात्र, केला. बाळाच्या आजीला संशय आल्याने तिने आरडाओरडा केला. त्याचवेळी आईनेही (Mother) धाव घेत बाळाला तिच्या ताब्यातून हिसकावून घेतले. यानंतर जमलेल्या नागरिकांनी महिलेला पकडून चोप दिला.

YouTube video player

दरम्यान, माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे (Deolali Camp Police Station) वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख व पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अफहत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, तपासाअंती तिला अटक करण्यात आली आहे. तर न्यायालयात हजर केले असता तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. तपास महिला उपनिरीक्षक मिताली कोळी करत आहेत.

पती गुजरातला, चोरीचा एक गुन्हा

तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, पतीशी वाद झाल्यानंतर ती बीडहून नाशिकला आल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. विशेष म्हणजे तिच्यावर यापूर्वी बीड जिल्ह्यातील पेठबीड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे ती सराईत असून बाळचोरीचे काही रॅकेट आहे का?, या दिशेने तपास सुरु आहे. तिचा पती नागनाथ हा गुजरात येथे मजुरी करत असल्याची माहिती समोर येत असून ती नाळवंडी येथे भाडेतत्वावर वास्तव्यास आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...