Saturday, July 11, 2026
Homeक्राईमNashik Crime News : नागरिकांच्या सतर्कतेने चोर रंगेहात पकडला; चोप देऊन पोलिसांच्या...

Nashik Crime News : नागरिकांच्या सतर्कतेने चोर रंगेहात पकडला; चोप देऊन पोलिसांच्या केले स्वाधीन

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शहरातील हिरावाडी परिसरातील (Hirawadi Area) शक्तीनगरमध्ये भरदिवसा घरफोडी आणि चोरीचा (Stolen) प्रयत्न करणाऱ्या भुरट्या चोराला नागरिकांनी (Citizen) रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले. कय्युम शेख असे या संशयिताचे नाव असून, परिसरातील जागरूक नागरिक नानासाहेब पवार यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी झाली.

- Advertisement -

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास शक्तीनगरमधील प्रशांत बाजीराव कदम यांच्या घराबाहेर चिटपाखरूही नसल्याची संधी साधून चोरटा कय्युम शेख याने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. त्याने घराबाहेरील पाण्याचे पितळी मीटर आणि सुमारे २० मीटर लांबीची विजेची केबल कापून चोरली. चोरीचा माल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच शेजारी राहणारे नानासाहेब पवार यांचे लक्ष त्याच्या संशयास्पद हालचालींकडे गेले.

दरम्यान, पवार यांनी वेळ न घालवता चोरट्याला हटकले आणि त्याला मालासह जागीच पकडले. आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले. संतप्त नागरिकांनी चोरट्याला चांगलाच चोप दिला आणि तातडीने पोलिसांना (Police) पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कय्युम शेखला ताब्यात घेतले आहे.

शेजारी असावा तर नानासाहेब पवारांसारखा

भरदिवसा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असले तरी, नानासाहेब पवार यांच्या हिमतीचे सर्वांनी कौतुक केले. “संकट समयी धावून येणारा शेजारीच खरा रक्षक असतो,” अशा शब्दात रहिवाशांनी पवारांच्या जागरूकतेचा गौरव केला.

ताज्या बातम्या

घोडेगाव कांदा बाजारातील उच्चांकी दरावर संशय; बाजार समितीने बजावल्या तीन आडतदारांना...

0
गणेशवाडी (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपआवारात कांदा लिलावादरम्यान प्रतिक्किंटल ४,२०० व त्यापेक्षा अधिक दराची नोंद झाल्यानंतर या व्यवहाराच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित...