Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik Bribe News : लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

Nashik Bribe News : लाच स्वीकारताना लिपिक जाळ्यात

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकाला (Clerk) तीन हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

- Advertisement -

विजय हनुमंत गवळी (४३, रा. नम्रता रो हाऊस नं. ४, वरदनगर, म्हसरूळ, नाशिक) असे लिपिकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराने वडिलोपार्जित गट नंबर १६८ मधील जमीन विक्री केली होती. यासंदर्भात २०२२ पासून हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून न्यायालयाने (Court) वादी प्रतिवादीच्या जमिनीची मोजणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तालुका भूमी अभिलेख कार्यालयास दिले होते.

YouTube video player

दरम्यान, अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे गवळी यांनी आठ हजार रुपयांची लाच मागितली. त्यात आधी तीन हजार रुपये अहवाल सादर करण्यापूर्वी व उर्वरित पाच हजार अहवालानंतर देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विजय गवळी यास लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक (Arrested) केली.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...