Thursday, October 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News : पंचवटीत ओमनी व्हॅनमध्ये आढळला रक्ताने माखलेला मृतदेह; तीन...

Nashik Crime News : पंचवटीत ओमनी व्हॅनमध्ये आढळला रक्ताने माखलेला मृतदेह; तीन दिवसांपासून उभी होती गाडी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

शहरात एकीकडे गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू असतानाच, दुसरीकडे पंचवटीतील अत्यंत वर्दळीच्या मालेगाव स्टॅण्ड (Malegaon Stand) परिसरात सोमवारी (दि.२१) सकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. येथे उभ्या असलेल्या एका मारुती ओमनी व्हॅनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही गाडी गेल्या तीन दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याची माहिती समोर येत असल्याने या घटनेबाबत संशय बळावला आहे.

- Advertisement -

रक्ताचे ओघळ रस्त्यावर; डोक्यावर गंभीर जखम

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव स्टॅण्ड परिसरात उभ्या असलेल्या मारुती ओमनी (एमएच १५ जीआर ८९७४) वाहनाच्या मागील दोन सीटांमधील मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, वाहनात (Vehicle) आणि थेट रस्त्यापर्यंत रक्ताचे ओघळ पसरलेले दिसून आले. स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले.

गाडी तळेगावच्या मालकाची?

प्राथमिक माहितीनुसार, सदर ओमनी व्हॅन मोहन भैरू भगत (रा. तळेगाव, महिरावणी) यांच्या मालकीची असल्याचे समजते. गणेशोत्सवामुळे मालेगाव स्टॅण्ड व पंचवटी परिसरात रात्री उशिरापर्यंत नागरिकांची (Citizen) आणि भाविकांची मोठी गर्दी असते. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी तीन दिवसांपासून व्हॅन उभी असूनही हा प्रकार उशिराने उघडकीस आल्यामुळे नागरिकांमधून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस ठाण्याचे (Panchvati Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या सह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

चंद्रशेखर

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप बॉम्बवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

0
मुंबई | Mumbaiमराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपावरून नवा दावा केला...