Tuesday, July 7, 2026
Homeक्राईमAshok Kharat Case : लॅपटॉपसह ईडी धडकणार; कॅप्टन खरातचे तुरुंगात जबाब नोंदविणार

Ashok Kharat Case : लॅपटॉपसह ईडी धडकणार; कॅप्टन खरातचे तुरुंगात जबाब नोंदविणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भविष्यवाणी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण व आर्थिक लूट करणारा भोंदू अशोककुमार एकनाथ उर्फ कॅप्टन खरात (Ashok Kharat) याच्याभोवती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपला पाश घट्ट केला आहे. नेहमी संशयितांना आपल्या कार्यालयात (Office) बोलावून चौकशी करणारी ईडी आता थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) तळ ठोकणार आहे. विशेष म्हणजे, नेहमीच्या चौकशीपेक्षा ही चौकशी हायटेक असणार आहे, कारण ईडीचे अधिकारी थेट लॅपटॉप, मोबाईल आणि प्रिंटर घेऊन तुरुंगातच खरातचा कडाडून जाबजबाब घेणार आहेत.

- Advertisement -

मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) ईडीच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाला ३ ते ९ जुलै या कालावधीत नाशिकरोड कारागृहात जाऊन चौकशी करण्याची विशेष परवानगी दिली आहे. चौकशीदरम्यान ईडीच्या पथकाला मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रिंटर, डिजिटल उपकरणे, पेन ड्राइव्ह आणि इतर आवश्यक शैक्षणिक व लेखन साहित्य तुरुंगात सोबत नेण्याची मुभा असेल, असे न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

तुरुंगाच्या इतिहासात डिजिटल उपकरणांसह अशा प्रकारची हायटेक चौकशी होण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या चौकशीतून ईडीच्या हाती अनेक मोठे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. खरातने स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर केलेल्या स्थावर मालमत्ता, खंडणीचे पैसे आणि साक्षीदारांना दिलेले रोख कर्ज यांसारख्या गंभीर बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी ही डिजिटल उपकरणे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. घटनास्थळीच कागदपत्रांचे (Document) स्कॅनिंग आणि प्रिंटिंग करून खरातला पुराव्यांचे दणके दिले जातील.

नऊ जुलैनंतर अहवाल?

ईडीच्या मुंबई झोनचे सहायक संचालक अभय कुमार यांच्या नेतृत्वाखालील अंमलबजावणी अधिकारी जी. बी. व्ही. सत्यनारायण, अंकुर त्रिपाठी आणि पंकज कुमार या चार अधिकाऱ्यांचे पथक पीएमएलए कायद्याच्या कलम ५० (२) आणि ५० (३) अंतर्गत हा जबाब नोंदवणार आहे. ७ जुलै रोजी मुंबई विशेष न्यायालयात या खटल्याची पुढील सुनावणी होणार असल्याने, ईडी त्यापूर्वीच खरातकडून महत्त्वाचे गुपिते काढून घेण्याच्या तयारीत आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar : साधूग्राम आणि घाट परिसराचे सुरक्षित व सक्षम नियोजन करावे...

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील साधूग्राम आणि घाट परिसराचे नियोजन आतापासूनच सुनियोजित पद्धतीने करण्याचे निर्देश कुंभमेळा मंत्री गिरीश...