Saturday, August 22, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वडील, मुलाला बेदम मारहाण

Nashik Crime News : गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वडील, मुलाला बेदम मारहाण

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

पाथर्डी फाटा अंबड लिंक रोडवर (Ambad Link Road) सिडको हॉस्पिटल चौकात कारला दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून वडील व मुलाला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने येथील तणाव निवळला.

- Advertisement -

बुधवारी सायंकाळी सिडको हॉस्पिटल चौकात (Cidco Hospital Chowak) वाहनांची मोठी गर्दी असताना एका दुचाकीचा कारला कट लागला. यावरून दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर कारचालकाने काही जणांना घटनास्थळी बोलावून घेत वडील व मुलाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, या प्रकरणी स्वप्नील सूर्यवंशी व मधुकर सूर्यवंशी (रा. उत्तमनगर, नवीन नाशिक) यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा पर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच मारहाणीची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे सिडको हॉस्पिटल चौक व सिम्बॉयसिस महाविद्यालय परिसरात (College Area) वाहतुकीची कोंडी झाली होती. काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...