Saturday, September 26, 2026
HomeनाशिकNashik News : एफडीएची मोठी कारवाई; गंगापूर रोडवरील 'अवंती स्नॅक्स' हॉटेलचा परवाना...

Nashik News : एफडीएची मोठी कारवाई; गंगापूर रोडवरील ‘अवंती स्नॅक्स’ हॉटेलचा परवाना निलंबित

नाशिक | Nashik

नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेंतर्गत नाशिकमध्ये (Nashik) मोठी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंगापूर रोड परिसरातील (Gangapur Road) प्रसिद्ध ‘मे. अवंती स्नॅक्स’ या हॉटेलचा अन्न परवाना प्रशासनाने तातडीने निलंबित केला आहे.

- Advertisement -

गोपनीय माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने मंगळवार (दि. १८ ऑगस्ट)रोजी गंगापूर रोड, पंपिंग स्टेशन परिसरातील मामामुंगी मंगल कार्यालयाजवळ असलेल्या अवंती स्नॅक्सवर छापा (Raid) टाकला. या तपासणी दरम्यान अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ च्या अंतर्गत स्वच्छता आणि अन्न हाताळणीबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या.

दरम्यान, या नियमावलीच्या परिशिष्ट-४ मधील तरतुदींचा भंग झाल्याने एफडीएने बुधवार (दि.१९ ऑगस्ट) पासून अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित केला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने व सहायक आयुक्त विनोद धवड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

नागरिकांना आवाहन

नाशिक विभागातील ही मोहीम अशीच तीव्रतेने पुढेही सुरू राहील. अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास नागरिकांनी थेट एफडीए नाशिक विभागाकडे तक्रार नोंदवून ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहआयुक्त मंगेश माने यांनी केले आहे.

तपासणीत आढळलेल्या प्रमुख त्रुटी

वृत्तपत्रांचा वापर : तयार अन्नपदार्थ ठेवण्यासाठी व वाढण्यासाठी वृत्तपत्रांच्या कागदांचा वापर केला जात होता.

आरोग्य तपासणीचा अभाव : आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती.

कीटक नियंत्रण नाही : उपाहारगृहात पेस्ट कंट्रोल (Key/Pest Control) केलेले नव्हते.

अस्वच्छता व देखभाल : कच्चे अन्नपदार्थ स्वीकारताना आवश्यक ती तपासणी केली जात नव्हती, तसेच भिंतींची रंगरंगोटी व स्वच्छता राखली गेली नव्हती.

ताज्या बातम्या

Rahata : पीक कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू;...

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर...