Wednesday, August 19, 2026
Homeक्राईमNashik Crime News: प्लॉटचा सौदा ५० लाखांचा, खरेदीखत मात्र हवेतच! तिघांविरुद्ध अंबड...

Nashik Crime News: प्लॉटचा सौदा ५० लाखांचा, खरेदीखत मात्र हवेतच! तिघांविरुद्ध अंबड पोलिसांत गुन्हा

नविन नाशिक | प्रतिनिधी
पाथर्डी फाटा परिसरातील दोन प्लॉट विक्री करण्याचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल ५० लाख रुपये उकळल्यानंतरही खरेदीखत करून न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितेशकुमार रमेशभाई फलदु (रा. नवीन नाशिक) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्येश विनुभाई नरोडिया, विनुभाई नरोडिया आणि भावनाबेन विनुभाई नरोडिया (रा. अंबड लिंक रोड, अंबड) यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेले ज्ञानेश्वर नगर, पाथर्डी फाटा येथील सर्व्हे क्रमांक ३१८/२/१/४६ आणि ३१८/२/१/४७ मधील प्रत्येकी १०५ चौरस मीटरचे प्लॉट विक्री करण्याचे प्रितेशकुमार यांना सांगितले. प्लॉटचा व्यवहार निश्चित झाल्यानंतर संशयितांनी प्रितेशकुमार यांच्या कडून टप्प्याटप्प्याने पैसे स्वीकारले. ऑनलाइन व्यवहार, बँक आरटीजीएस आणि रोख अशा विविध माध्यमांतून एकूण ५० लाख रुपये देण्यात आले. कोटक महिंद्रा बँकेच्या अंबड शाखेतील खात्यातून सुरुवातीला १० लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर १६ डिसेंबर २०२३ रोजी आणखी १० लाख, तर ३१ जानेवारी २०२४ रोजी ८ लाख रुपये आरटीजीएसद्वारे अदा करण्यात आले. उर्वरित २२ लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण रक्कम अदा केल्यानंतरही आरोपींनी संबंधित प्लॉटचे खरेदीखत करून दिले नाही. वारंवार मागणी करूनही टाळाटाळ होत असल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

- Advertisement -

नसरापूरची पुनरावृत्ती! अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मद्रुपकर पुढील तपास करीत आहेत. प्लॉटच्या व्यवहारासाठी २०२३-२४ मध्ये मोठी रक्कम देण्यात आली. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतरही खरेदीखत झाले नसल्याने या व्यवहारामागील नेमकी पार्श्वभूमी आणि रकमेच्या व्यवहारांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे.

ताज्या बातम्या

निवडणुक

खासदार संजय राऊतांचा निवडणुक आयोगावर गंभीर आरोप, म्हणाले, पक्ष आणि चिन्ह…

0
मुंबई | Mumbaiशिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे पक्षाची जोरदार बाजू...