Thursday, September 10, 2026
Homeक्राईमNashik Crime News : १५ कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भोंदूबाबा...

Nashik Crime News : १५ कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारा भोंदूबाबा गजाआड; महाराष्ट्र ‘अंनिस’च्या प्रयत्नांना यश

नाशिक | Nashik

मंत्र-तंत्र आणि पूजाविधी करून तब्बल १५ कोटी रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुंबईतील (Mumbai) नागरिकांना (Citizen) लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाचा भांडाफोड झाला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) मध्यस्थीनंतर अभोणा पोलीस ठाण्यात (Abhona Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य भोंदू बाबासह त्याच्या दोन साथीदारांना अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

नेमका प्रकार काय?

मुंबईच्या बोरिवली परिसरातील (Boriwali Area) राजाराम सिताराम शेलार आणि त्यांच्या चार मित्रांना अभोणा (ता. कळवण) हद्दीतील पिंपळे खुर्द येथील भोंदू हिराचंद शिवाजी बर्डे बाबा याच्याबद्दल माहिती मिळाली होती. सुरुवातीला प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन भोंदूने २ लाख रुपये पाडल्याचा बनाव रचला. हा चमत्कार पाहून जाळ्यात अडकलेल्या पीडितांना अकरा लाख रुपये दिल्यास १५ कोटींचा (Money) पाऊस पाडण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार पीडितांकडून १० लाख ९५ हजार रुपये उकळण्यात आले.

असा उघडकीस आला प्रकार

पूजाविधीच्या वेळी नारळात स्फोट घडवून आणत ३ कोटी रुपयांचा पाऊस पडल्याचे सांगत भोंदूने पैशांची गोणी पीडितांच्या हवाली केली. ही गोणी ७ दिवस न उघडता पूजा करण्याचे सांगत उघडल्यास कोप होईल अशी भीती दाखवली. नंतर पुन्हा पैशांच्या ‘शुद्धीकरणा’च्या नावाखाली अतिरिक्त रक्कम उकळली गेली. शंका आल्याने पीडितांनी गोणी उघडून पाहिली असता त्यात वरची एकच नोट खरी आणि आत लहान मुलांच्या खेळण्यातील खोट्या नोटा असल्याचे निष्पन्न झाले.फसवणूक उघडकीस आल्यानंतर पैशांची मागणी केली असता भोंदूने कपडे काढून अमवास्येच्या रात्री स्मशानात पूजा करण्याचा अजब अट्टहास धरला आणि मारून टाकण्याची धमकी दिली. यानंतर पीडितांनी महाराष्ट्र ‘अंनिस’कडे धाव घेतली.

पोलिसांनी अशी केली कारवाई

महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या सहकार्याने पीडितांनी अभोणा पोलीस ठाणे गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी तत्परतेने कारवाई करत भोंदू हिराचंद बर्डे व त्याच्या ६ साथीदारांवर जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला. सध्या भोंदू बाबासह तिघांना अटक (Arrested) करण्यात आली असून, अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी अभोणा पोलीस किंवा महाराष्ट्र ‘अंनिस’शी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

MPSC Exam : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २५...