Monday, September 28, 2026
HomeनाशिकShalarth ID Scam : उपासनी, हिंगाेणेकरच्या अर्जावर 'या' तारखेला सुनावणी;...

Shalarth ID Scam : उपासनी, हिंगाेणेकरच्या अर्जावर ‘या’ तारखेला सुनावणी; जामिनासाठी न्यायालयांचे उंबरठे झिजवण्याची धडपड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात गेल्या नऊ महिन्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) गजाआड असलेला मुख्य संशयित व सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याच्यासह धुळ्यातून (Dhule) नाट्यमयरित्या जेरबंद करण्यात आलेला जळगावचा माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर या दोघांच्या जामीन अर्जावर आज (दि. २८) नाशिकरोडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. 

- Advertisement -

या घोटाळ्याचे जाळे राजकीय व संस्थात्मक वर्तुळापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अटकेत असलेले शेंदूर्णी (जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व भाजप पदाधिकारी संजय गरुड आणि त्याचा भाऊ दीपक गरुड या बंधूंनीही जामिनासाठी धाव घेतली आहे. संजय गरुडच्या अर्जावर ३ ऑक्टोबर रोजी, तर दीपक गरुडच्या अर्जावर ७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी केलेल्या सखोल तपासात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तपासादरम्यान तब्बल १२४ प्रकरणांमध्ये अधिकृत नोंदी व प्रत्यक्ष डेटा यांच्यात प्रचंड विसंगती आढळली आहे.

एकाच जावक क्रमांकावर वेगवेगळ्या नावांचे आदेश जारी करून शासनाची (Government) कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. नाशिक विभागातील एकूण ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील तब्बल ६३८ शिक्षक-कर्मचारी एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. आर्थिक गुन्हे हे समाजासाठी अत्यंत घातक असून ते ‘व्हाईट कॉलर क्राईम’ (उच्चभ्रू गुन्हेगारी) श्रेणीत येतात, असे स्पष्ट निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वीच नोंदवले आहे. त्यामुळे जामीन मिळवण्यात संशयितांना अडचण येत आहे.

उपासनीचा मुक्काम वाढणार की जामीन?

​सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याने यापूर्वी वैद्यकीय कारणास्तव कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन महिने जामीन अर्ज प्रलंबित राहिल्यानंतर तोही फेटाळण्यात आला होता. त्यामुळे उपासनीचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम लांबला. आता पुन्हा त्याने नव्या युक्तिवादासह जामिनासाठी धाव घेतली आहे. ६५ वर्षीय साहित्यिक असलेला माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याने बनावट प्रस्तावांना गैरमार्गाने मंजुरी दिल्याचे सिद्ध झाले असल्याने, त्याच्याही जामीन अर्जावरील आजच्या सुनावणीकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

​आतापर्यंत आठ संशयित जाळ्यात

१. नितीन उपासनी (सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक)
२. शशिकांत हिंगोणेकर (माजी शिक्षणाधिकारी)
३. किरण पाटील
४. राहुल पवार
५. प्रशांत वाडीले (संस्थाचालक व एजंट)
६. संजय गरूड (संस्थाचालक व भाजप पदाधिकारी)
७. दीपक गरूड (सहसचिव)
८. तुषार साळुंके (लॅब असिस्टंट)

ताज्या बातम्या

NDCC News : निफाड कारखान्याच्या वसुलीवरून गदारोळ; जिल्हा बँक सर्वसाधारण सभेत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Bank) ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात निफाड सहकारी साखर कारखान्याची थकबाकी...