Saturday, October 24, 2026
Homeक्राईमNashik Crime News : प्रकाश लोंढे पाठोपाठ भूषणलाही दिलासा? जामीन अर्जावर आज...

Nashik Crime News : प्रकाश लोंढे पाठोपाठ भूषणलाही दिलासा? जामीन अर्जावर आज सुनावणी

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर हद्दीत गाजलेल्या ऑरा बारमधील गोळीबार (Firing Case) प्राणघातक हल्ला आणि खंडणी प्रकरणातील गुन्हे नोंद असलेल्या कुख्यात पीएल ग्रुप (लोंढे टोळी) मधील मोक्कातील संशयित भूषण उर्फ भाईजी प्रकाश लोंढे याच्या जामीन अर्जावर सध्या न्यायालयात (Court) नियमित युक्तिवाद सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी (दि. २२) होणार असून, या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर २०२५ मध्ये सातपूर हद्दीत गोळीबार, प्राणघातक हल्ले, खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांत सक्रिय सहभाग असल्याप्रकरणी लोंढे टोळीविरुद्ध (Londhe Gang) सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी कठोर पावले उचलत या टोळीविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली होती. या अंतर्गत संशयित भूषण उर्फ भाईजी लोंढेसह शुभम उर्फ भुऱ्या राजू पाटील, वेदांत संजय चाळगे, प्रकाश उर्फ बॉस लोंढे आणि दीपक उर्फ ‘नाना’ लोंढे यांच्यावर खटला सुरू आहे. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला असून सध्या न्यायालयात नियमित खटला व सुनावणी सुरू आहे.

यापूर्वी, ऑगस्ट २०२६ मध्ये नाशिक सत्र न्यायालयाने मुख्य संशयित प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. तपासात प्रकाश यांनी टोळीच्या सदस्यांना सोन्याच्या २३ अंगठ्या वाटल्याचे, तर दीपकने खंडणीचा पैसा व्हाइट करण्याचा (कायदेशीर मार्गावर आणण्याचा) प्रयत्न केल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले होते.मात्र, अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) या खटल्यासह संबंधित गुन्ह्यात प्रकाश लोंढे (Prakash Londhe) याला दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गत १५ ऑक्टोबर रोजी प्रकाश कारागृहाबाहेर आहेत. विशेष म्हणजे, नुकत्याच गेलेल्या दसऱ्यानिमित्त (दि. २०) शहरातील काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रकाश लोंढे प्रत्यक्ष सहभागी झाल्याचे दिसून आले होते, तर बुधवारी (दि. २१) न्यायालयातही प्रत्यक्ष हजर असल्याचे दिसून आले.

भूषणच्या जामिनाकडे नजरा

प्रकाश लोंढे यांची सुटका झाल्यानंतर आता त्यांचा मुलगा तथा टोळीचा सदस्य भूषण उर्फ भाईजी लोंढे यालाही जामीन मिळणार का? याविषयी शहरात चर्चा रंगली आहे. सध्या न्यायालयात भूषणच्या जामीन अर्जासह खटल्यातील विविध मुद्द्यांवर नियमित युक्तिवाद सुरू आहे. या प्रक्रियेत कारागृह प्रशासन आणि तपासी अधिकाऱ्यांसह संबंधित यंत्रणांचे म्हणणे न्यायालयात सविस्तर सादर झाले असून, गुरुवारी (दि. २२) होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...