Wednesday, October 14, 2026
Homeक्राईमNashik Crime News : उच्च न्यायालयाकडून 'बॉस'ला जामीन मंजूर; मात्र कारागृहातील मुक्काम...

Nashik Crime News : उच्च न्यायालयाकडून ‘बॉस’ला जामीन मंजूर; मात्र कारागृहातील मुक्काम कायम, नेमकं कारण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

त्र्यंबक रोडवरील (Trimbak Road) आयटीआय सिग्नल येथील ऑरा बारमधील गोळीबार, खंडणी व अपहरणप्रकरणी गेल्या वर्षभरापासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेला माजी नगरसेवक प्रकाश लोंढे उर्फ बाॅसला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. मात्र गोळीबारासह खंडणीसारखे गंभीर गुन्ह्यात मकोका लावण्यात आल्याने लोंढेचा कारागृहातील मुक्काम कायम राहणार आहे.

- Advertisement -

बारमधील गोळीबार (Firing) खंडणी आणि अपहरणाचा प्रकार गेल्या ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे घडला होता. याप्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्यासह मुलगा भूषण व दीपक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांच्यासह पीएल ग्रुपच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर लोंढेच्या पीएल ग्रुपविरोधात खंडणीसह प्राणघातक हल्ला, धमकी, आर्थिक फसवणूकीचे शहर आयुक्तालयातील अंबड, सातपूर पोलिसात सुमारे आठ ते नऊ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लोंढे टोळीविरोधात संघटीत गुन्हेगारी अंतर्गत मकोका लावला आहे. गेल्या वर्षभरापासून लोंढे पिता-पूत्र नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मकोका कोठडीत आहेत.

दरम्यान, लोंढे याने जामीनासाठी (Bail) सत्र न्यायालयात (Court) धाव घेतली असता, अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बारमधील गोळीबार व खंडणीच्या गुन्ह्यात प्रकाश लोंढे यास मंगळवारी (ता. १३) मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. मिलिंद जाधव यांनी जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लोंढे यास दिलासा मिळाला आहे. लोंढे यास उच्च न्यायालयाने खंडणी व गोळीबाराच्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. परंतु लोंढे याच्याविरोधात इतर आठ ते नऊ गुन्ह्यांसह मकोकाचीही कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असला तरी त्याची कारागृहात सुटका होण्याची शक्यता नाही.

असे आहे प्रकरण?

आयटीआय सिग्नल परिसरात ५ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री दीडच्या सुमारास आयटीआय सिग्नलवरील ऑरा बारबाहेर काही तरुणांमध्ये वाद झाला असता, यावेळी भूषण लोंढे व त्याच्या टोळीने एकावर गोळी झाडली होती. यात वरुण तिवारी हा ग्राहक जखमी झाला हाेता. बार चालकांकडून भूषण लोंढे याने खंडणी उकळली होती. याप्रकरणी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह खंडणीप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, दुसऱ्या दिवशी औरा बारचे चालक संशयित बिपीन पुरुषोत्तम पटेल, संजय शर्मा या दोघांच्या कुटूंबियांना संशयित प्रकाश लोंढे याच्यासह चौघांनी जबरदस्तीतून उचलून अपहरण केले होते. दोन गुन्हे सातपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : प्रवासी भरण्याच्या वादातून तरुणावर पेव्हर ब्लॉकने हल्ला;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबक नाका सिग्नल (Trimbak Naka Signal) परिसरात रिक्षात प्रवासी भरण्याच्या वादातून प्रेम हिरे या तरुणाच्या डोक्यात दगड आणि पेव्हर ब्लॉकने...