Friday, November 20, 2026
Homeक्राईमNashik Crime News : चूल अन् तवा सांभाळणाऱ्या हातांनी मारला दारुवर डल्ला;...

Nashik Crime News : चूल अन् तवा सांभाळणाऱ्या हातांनी मारला दारुवर डल्ला; मालकाच्या परदेशगमनाची संधी साधली

रेस्टॉरंटमधील नेपाळी स्वयंपाक्यांचा प्रताप

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात कामावर ठेवलेल्या परप्रांतीय कामगारांची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना गंगापूर रोड परिसरात (Gangapur Road Area) उघडकीस आली आहे. हॉटेल मालक बाहेरगावी गेल्याची संधी साधत तेथील तीन नेपाळी स्वयंपाक्यांनीच काऊंटरमधील रोख रक्कम आणि महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण १ लाख ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

- Advertisement -

​रेस्टॉरंटचे व्यवस्थापक सचिन विठ्ठलसिंग राजपूत (वय ३४, रा. अपनाघर, ध्रुवनग) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोडवरील रिजवानी फार्म येथील कि-कि रेस्टॉरंट अँड बारमध्ये संशयित संशयित कपिल भारतसिंग (वय २५), रुपेश बिश्वकर्मा (वय २२) आणि वरुण भट्टा (वय २६, सर्व मूळ रा. नेपाळ, सध्या रा. कि-कि रेस्टॉरंट अँड बार, गंगापूर रोड) हे तिघे स्वयंपाकी म्हणून कामाला होते. हॉटेल मालक बाहेरगावी जाण्यापूर्वी त्यांनी व्यवसायाची १ लाख १४ हजार रुपयांची रोकड (५०० रुपये दराच्या २२८ नोटा) हॉटेलच्या काउंटरमध्ये ठेवली होती.

ही बाब या तिघांच्या लक्षात आली होती. मालक शहरात (City) नसल्याचा फायदा घेत दि. १५ नोव्हेंबर रोजी पहाटे २ ते ४ वाजेच्या सुमारास या तिघांनी संगनमत करून १ लाख १४ हजार रुपयांची रोकड तसेच हॉटेलमधील विविध कंपन्यांच्या ६० हजार रुपये किमतीच्या १५ महागड्या स्कॉचच्या बाटल्या असा एकूण १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला. प्रकार उघडकीस आल्यानंतर व्यवस्थापक सचिन राजपूत यांनी (दि. १८) गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी (Police) भारतीय न्याय संहिता कलम ३०६ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  

संशयित हॉटेलमध्येच होते मुक्कामी

संबंधित तिन्ही संशयित हॉटेलमध्येच निवासास होते आणि स्वयंपाकी म्हणून कार्यरत होते. मालकाने बाहेरगावी जाताना रोकड काउंटरमध्ये ठेवल्याची माहिती त्यांना सहज उपलब्ध झाली, यातून अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या. तिघेही मूळचे नेपाळचे रहिवासी असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. ३ दिवसांच्या कालावधीत संशयित नेपाळ सीमेकडे पसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाेलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे.  

ताज्या बातम्या

राज्यात सर्वाधिक थंड धुळे @६.३, निफाड @६.५; रब्बी पिकांना दिलासा, द्राक्ष...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यातील काही भागांत कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार सुरू असतानाच शुक्रवार (दि.२० नोव्हेंबर) रोजी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान धुळे...