Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सराईत सावकार पसार

Nashik Crime News : सराईत सावकार पसार

चार पथके रवाना, तक्रार करण्याचे आवाहन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अवैध सावकारी (Money lender) करुन डीएसपी बासुंदी चहाच्या व्यावसायिकास आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याच्या दाखल गुन्ह्यानंतर सराईत सावकार वैभव देवरे (Vaibhav Deore) पसारच आहे. दरम्यान, देवरेच्या अवैध सावकारीबाबत कुणाची काही तक्रार, फिर्याद असल्यास शहर गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर त्याच्या मागावर शहर गुन्हेशाखेची चार ते पाच पथके रवाना करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी त्याची पत्नी व शालक अटकेत (Arrested) आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक मध्यची जागा शिवसेना किंवा राष्ट्रवादीला सुटणार? आमदार देवयानी फरांदे तातडीने फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईत

वैभव देवरे, सोनाली वैभव देवरे (रा. चेतनानगर), निखिल पवार (रा. राणेनगर) यांच्याविरोधात गंगापूर पोलिसात अवैध सावकारी व चहा व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.धीरज पवार या चहा व्यावसायिकाने नांदूरी घाटात (कळवण) गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी गीतांजली पवार यांनी फिर्याद (FIR) दिली आहे.

हे देखील वाचा : Political Special : येवला मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष

दरम्यान, गुन्हा दाखल होताच शहर गुन्हेशाखेच्या मध्यवर्ती शाखेने संशयित (Suspected) देवरेच्या घरी छापा टाकत पत्नी सोनाली व शालक निखिल पवार या दोघांना अटक केली. तर पोलीस दाखल होण्यापूर्वीच संशयित वैभव हा पसार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गुन्हेशाखेची (Crime Branch) चार ते पाच पथके त्याच्या मागाबर रवाना करण्यात आली आहे. पोलीस कसून शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात यापूर्वीही पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे इंदिरानगर पोलिसात (Indiranagar Police) दाखल आहेत.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून १७ जणांना एबी फॉर्मचे वाटप; कुणाचा आहे समावेश?

जामिनावर सुटताच पुन्हा वसुली

वैभव देवरे याच्यावर इंदिरानगर पोलिसांत अवैध सावकारी व गंभीर कलमांन्वये पाच गुन्हे दाखल असून सहावा गुन्हा (दि. १९) रोजी गंगापूर पोलिसांत दाखल झाला आहे. दरम्यान, इंदिरानगरला दाखल गुन्ह्यांत देवरेला जामीन मिळताच त्याने सावकारीची उर्वरित वसुली, धाक निर्माण करुन धमकी देणे नागरिकांना सुरु केले होते. त्यातून शेती नावावर करुन घेण्याचा दम भरल्यानंतर व्यावसायिक धीरज यांनी आत्महत्या केली होती.

हे देखील वाचा : नाशकात भाजपला मोठा धक्का! माजी सभापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

महत्वाचे मुद्दे

वैभवची पत्नी सोनाली व तिचा भाऊ निखीलचे वैभवला सहाय्य
जामीन मिळताच व्याजाची वसुली
नवीन मोबाईल, सीमकार्डवरून तक्रारदारांना धमक्या
सोनालीने देखील अनेक महिलांना वसुलीसाठी फोन केल्याचे समजते
धीरज हा वैभवसोबत राहून तक्रारदारांना धाक दाखवायचा
पुन्हा घरामडतीत कागदपत्रे व पुरावे मिळाले
छळ, फसणूक झाली असल्यास तक्रार करा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या