नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तुरुंगाची हवा खाऊन दोन महिनेही उलटले नाहीत, तोच नाशिकरोड आणि उपनगरच्या हद्दीत पुन्हा एकदा गावठी कट्ट्यांचे बार घुमले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावचा सराईत भूषण गोसावी याने नाशिकरोडच्या (Nashik Road) स्थानिक यादव व म्हस्के-पाईकराव टोळीची सूत्रे हाती घेत थेट राजकीय-व्यावसायिक वर्तुळात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला आहे. “कोणी प्रशांत जाधवला सपोर्ट केला, तर त्याचा गेमच करून टाकू,” अशी उघड धमकी देत थेट मर्सिडीजवर गोळीबार करण्यापर्यंत या टोळीची मजल गेल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्थानिक गुन्हेगारीत (Criminal) वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गोसावी टोळीने गेल्या २४ तासांत सलग दोन थरार घडवून आणले. २९ जुलैच्या रात्री नाशिकराेड बसस्टॉपवर अफरोज खान या तरुणाला पिस्तुल व लोखंडी शस्त्राचा धाक दाखवून बिअरच्या बाॅटलने डोके फोडले आणि ‘इथले भाई आम्हीच’ असा आव आणला. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, ३० जुलैच्या मध्यरात्री देवळाली गावातील केशवलक्ष्मी अपार्टमेंटबाहेर स्क्वाॅडा कारमधून आलेल्या या टोळक्याने थाेडक्यातील राजकारणात असलेले प्रशांत जाधव यांच्या मर्सिडीजवर दगडफेक करत थेट गावठी पिस्तुलमधून गोळी झाडली. सुदैवाने गोळी बोनेटला लागल्याने पुढील अनर्थ टळला.
नाशिकरोड, सुभाषरोड, देवळाली गाव, फर्नांडीसवाडी, सुंदररनगर आणि जयभवानी रोड या भागात उज्जैनवाल, यादव, बेद, बेहेनवाल, म्हस्के-पाईकराव, धेनवाल व राठोड टोळ्यांची भाईगिरी सर्वसामान्यांसाठी पुन्हा डाेकेदुखी ठरु लागली आहे. कोयते भिरकावणे, गावठी कट्ट्यातून राऊंड फायर करणे आणि जामिनावर (Bail) बाहेर येऊन पूर्ववैमनस्यातून किंवा सुपारी घेऊन ‘गेम’ करण्याची भाषा करणे, हे या टोळ्यांचे उद्याेग सामान्यांत भितीत नर्माण करत आहेत.
बालेकिल्ल्याची आस
एकाच रात्रीत उपनगर व नाशिकरोड पाेलिसांत (Nashik Road Police) खुनाचा प्रयत्न व दराेड्याचा गुन्हा दाखल झाला असला, तरी सराईत संशयित भूषण गोसावी, दानिश शेख, सुमित मोरे, साेनू व माेनू शेख, स्वप्निल माेरे आणि साथीदार उघडपणे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. सध्या संशयित पसार असून त्यांच्या अटकेनंतर काेयते व कट्टे जप्त करुन कायद्याच्या बालेकिल्ल्यात यथाेचित सन्मान केला जाणार आहे. शिवाय घटनास्थळांसह परिसरातून त्यांची मिरवणुक काढली जाणार आहे.




