Thursday, July 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील ९ महिन्यांपासून फरार मुख्य संशयित...

Nashik Crime News : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील ९ महिन्यांपासून फरार मुख्य संशयित जेरबंद

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati 

फुलेनगर परिसरातील मुंजाबा चौकात झालेल्या दोन गटांतील दगडफेक आणि गोळीबार प्रकरणातील (Firing Case) मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात पंचवटी पोलिसांच्या (Panchvati Police) गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून हुलकावणी देणाऱ्या विकास ऊर्फ विकी विनोद वाघ (२६, रा. मरीमाता मंदिराच्या मागे, पाटकिनारी, फुलेनगर) याच्यासह त्याचा साथीदार किरण रामदास मोरे (वय १८, रा. फुलेनगर) या दोघांना पोलिसांनी शिताफीने बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. मुख्य संशयित विकी वाघ याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात यापूर्वीच ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

- Advertisement -

नऊ महिन्यांपासून होता फरार

गेल्या वर्षी २२ जुलै २०२५ रोजी फुलेनगरमधील (Phulenagar) मुंजाबा चौक परिसरात दोन गटांमध्ये जुन्या वादातून जोरदार दगडफेक आणि गोळीबार झाला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर मुख्य संशयित विकी वाघ हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता. पोलीस गेल्या नऊ महिन्यांपासून त्याच्या मागावर होते. गुन्हे शोध पथक तपास करत असताना अंमलदार अंकुश काळे व नितीन पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, संशयित विकी वाघ आणि किरण मोरे हे नाशिक रोड परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ नाशिक रोड परिसरात सापळा रचून अत्यंत शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला.

यांनी बजावली कमगिरी

ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, गणेश आगोणे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, योगेश वार्यकडे, विनोद चितळकर, नितीन पवार, अंकुश काळे आणि संतोष पाटील यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Nashik Rain News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला; दुतोंड्या मारुतीच्या...

0
नाशिक | Nashik शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रभर जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाच्या (Rain) सततच्या सरींमुळे गोदावरी...