Thursday, October 1, 2026
HomeनाशिकNashik Crime News : सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ; विवाहितेची शेततळ्यात आत्महत्या

Nashik Crime News : सासरच्यांकडून शारीरिक व मानसिक छळ; विवाहितेची शेततळ्यात आत्महत्या

नाशिक | Nashik

हुंड्यासाठी होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू यांच्याविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात (Yeola Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली नामदेव नवले (वय २५) असे मयत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत तिचे वडील शरद रामचंद्र निकुळे यांनी पोलिसांत फिर्याद (FIR) दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, वैशालीचा विवाह जून २०२३ मध्ये नामदेव मारुती नवले यांच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र काही महिन्यांनंतर शेतीच्या कामासाठी आणि चारचाकी वाहन खरेदीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात येऊ लागली.

मागणी पूर्ण न झाल्याने पती नामदेव, सासरे मारुती नवले आणि सासू विमलबाई मारुती नवले यांनी वैशालीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततचा त्रास, शिवीगाळ आणि पैशांसाठीचा दबाव यामुळे वैशाली मानसिकदृष्ट्या खचली होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी पती, सासरे व सासू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Kopargaon : महागाई, मतदार याद्यांतील घोळ आणि दुष्काळावरून रोहित पवारांचा सरकारवर...

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon वाढती महागाई, मतदार याद्यांतील कथित घोळ, राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घडामोडींवरून आ. रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली....