Saturday, May 9, 2026
Homeक्राईमNashik Crime News : खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

Nashik Crime News : खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

नराधम भाचा अन् साथ देणारी मावशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पखालरोडवरील गुलशन कॉलनीतील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Girl Student) वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या शिक्षिकेवर पालकांनी विश्वास ठेवून मुलीला शिक्षणासाठी पाठवले तिनेच आपल्या नराधम भाच्याला साथ देत या कृत्यात सहकार्य केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलिसांनी संशयित क्लासचालक मावशी व भाच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, संशयित राशेदा रशिद शेख ही पखालरोडवरील कसक पार्क येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी शिकवणी (कोचिंग क्लास) चालवते. या क्लासमध्ये पीडित मुलगी नियमितपणे अभ्यासासाठी जात होती. मात्र, जुलै २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा अत्याचाराचा प्रकार घडला. पीडितेने मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिलेल्या बहाण्याने घरातील फिर्यादीनुसार, शिक्षिका राशेदा हिने पीडितेवर नजर ठेवून तिला विविध बेडरूममध्ये पाठवले.

त्या ठिकाणी राशेदाचा भाचा संशयित सिबतेन रजा शेख (२०, रा. मेहबूबनगर, वडाळागाव) याने पीडितेशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. या अत्याचाराबाबत कोणाकडेही वाच्यता करू नये, यासाठी दोन्ही संशयितांनी दबाव टाकला. तिला वेळोवेळी धमकावण्यात आले, तर कधी प्रलोभने दाखवून तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर या छळाला कंटाळून पीडितेने मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. संशयितांवर (Suspected) बीएनएस कलमांसह पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुस्तफ शेख तपास करत आहेत. सध्या दोन्ही संशयित पसार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

पालकांमध्ये संतापाची लाट

शिक्षकी पेशाला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे शहरात, विशेषतः पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विश्वासाच्या नात्याला तडा देणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. घराशेजारील किंवा नामांकित वाटणाऱ्या क्लासेसमध्येही मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

ताज्या बातम्या

अ‍ॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

0
येवला | प्रतिनिधी Yeola तालुक्यातील देवळाणे येथे रात्रीच्या सुमारास झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात शेतकरी दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. त्यांचेवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत....