Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Crime News: खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी देवरेवर मोक्काची कारवाई

Nashik Crime News: खंडणी, अवैध सावकारी प्रकरणी देवरेवर मोक्काची कारवाई

पत्नीसह तिच्या भावाचाही सहभाग; प्रॉपर्टी होणार सील

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात अतिशय हीन पद्धतीने सावकारीचा व्यवसाय करून वसुली करणाऱ्या खंडणीखोर व अवैध सावकार वैभव देवरेवर आता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोक्काची कारवाई केली आहे. त्यामुळे पंधरा गुन्हे नोंद असलेल्या देखरेसह त्याची पत्नी व शालकाची मोकानुसार पुन्हा एकदा झाडाझडती करून चौकशी केली जाणार आहे. देवरेवर केलेल्या या कारवाईमुळे शहरातील अन्य अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहे.

दरम्यान, देवरेसह त्याची पत्नी व शालकाला अटक केली जाणार असून निर्धारित वेळेत दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. वैभव यादवराव देवरे, त्याच्या टोळीतील सदस्य व पत्नी सोनल वैभव देवरे, गोविंद पांडुरंग ससाणे व निखिल नामदेव पवार अशी संशयितांची नावे आहेत. देवरेने या संशयितांच्या मदतीने गुन्हेगारी टोळी निर्माण करून संघटितरीत्या आर्थिक फायद्याकरता इंदिरानगर, अंबड, गंगापूर, मुंबईनाका परिसरात लोकांची फसवणूक करून अवैध सावकारी केल्याचे निष्पन्न झाले आहे. लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यापोटी अवाजवी व्याजाची रक्कम वसूल करून ते करताना दमदाटी, जीवे मारण्याची धमकी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, जबरी चोरी, खंडणीद्वारे वसुली करून दहशत निर्माण केली. देवरेवर एप्रिल २०२४ मध्ये खंडणी व अवैध सावकारीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याच्यावर तब्बल १४ गुन्हे दाखल झाले.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Crime News: पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनमध्ये ‘कोम्बिंग’ ऑपरेशन

दरम्यान, त्याने याआधी तुरुंगातून सुटका करण्यासाठी जामिनाचा अर्ज केला होता. मात्र त्याला जामीन मंजूर झाला नाही. सध्या तो व साथीदार तुरुंगात आहेत. संशयितांची दहशत मोडून काढण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम १९९९ चे (मोक्का) कलम ३ (१) (ए), ३(२), ३(४), ३(५) ही वाढीव कलमे लावून या कायद्याअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आली आहे. तर वैभव देवरेने आतापर्यंत उभारलेले साम्राज्य, त्याची एकूण मालमत्ता जाम केली जाणार असून तिची किंमत २० ते २५ कोटींहून अधिकची असल्याचे कळते. तपास सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख करत आहेत.

सावकारीची तक्रार करावी
नाशिक शहरात जे संशयित अवैध सावकारी करून नागरिक, कर्जदारांकडून अवाजवी व्याज वसूल करत आहेत त्यांची माहिती संकलित केली जात आहे. अवाजवी व्याज उकळणाऱ्या सावकारांविरुद्ध नागरिकांनी निःसंकोच व निडरपणे तक्रार केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

तेव्हा देवरे होता फिर्यादी
‘सहा महिन्यांत पैसे डबल’ अशी स्कीम देत मुंबईतील दाम्पत्याने वैभव देवरेसह कुटुंबास ५५ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातला होता. ही घटना जुलै २० २३ मध्ये उघड झाली होती. त्यानुसार, संशयित रवी बारकू गवळी व रुची रवी गवळी (दोघे रा. रामभाऊ भोगले मार्ग, घोडपदेव, मुंबई) यांच्यावर नाशिकमध्ये एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबतची फिर्याद वैभव यादवराव देवरे (३८, रा. सीमा पार्क, चेतनानगर) याने इंदिरानगर पोलिसांत दाखल केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...