Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime News: तळीरामांची झिंग उतरली, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर कारवाई

Nashik Crime News: तळीरामांची झिंग उतरली, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपींवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी
पंचवटीतील पेठफाटा येथे मद्यसेवनाच्या कारणातून मित्राने मित्राचा खून केल्याची घटना बुधवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली. याआधीही सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवनाच्या कारणातून खून, खुनाचे प्रयत्न, मारहाण, जबरी चोरीसारखे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनी बुधवारी रात्री विशेष मोहीम राबवून मोकळी मैदाने, जॉगिंग ट्रॅक, उद्यानांमध्ये मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात ९५ मद्यपींना पकडून पोलीस ठाण्यात नेत कारवाई केली.

शहरात बहुतांश गुन्हे रात्रीच्या सुमारास घडत असल्याचे प्रकार आढळतात. त्यातही आरोपींकडून मद्यसेवन केल्याचेही पोलीस तपासात समोर येते. संशयित टोळके सार्वजनिक ठिकाणी खुलेआम किंवा चोरीछुप्या पद्धतीने मद्यसेवन करून गुन्हे करत असल्याचे चित्र आहे. पंचवटीतील एरंडवाडी येथेही संशयित संतोष रमेश अहिरे (३२, रा. एरंडवाडी) याने दारू पिण्याच्या कारणातून त्याचा मित्र शांतीलाल बन्सी ब्राह्मणे (२९, रा. बोरगड) याचा खून केल्याची घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्री घडली. या घटनेने सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Crime News: चहा वाटपाच्या मजुरीच्या पैशातून वाद; पंचवटीतील ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा

त्यानुसार, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एक मध्ये पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांच्यासह गंगापूर, आडगाव, म्हसरूळ, पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली, मुंबईनाका पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री १० ते १२ यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई केली. मोकळी मैदाने, उद्याने, जॉगिंग ट्रॅक येथे मद्यसेवन करणाऱ्यांची धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर तेथे कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही मोहीम कायम राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस ठाणेनिहाय मद्यपी
आडगाव – १०
म्हसरूळ – ११
पंचवटी – २७
सरकारवाडा – ०४
भद्रकाली – १६
मुंबईनाका – १५
गंगापूर – १२
एकूण – ९५

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...