Thursday, November 12, 2026
HomeनाशिकNashik Crime News : पाेलिसांनी काढली टवाळखोरांची हवा! सोशल मीडियावर 'भाईगिरी'ची नशा अन्...

Nashik Crime News : पाेलिसांनी काढली टवाळखोरांची हवा! सोशल मीडियावर ‘भाईगिरी’ची नशा अन् कायद्याचा दणका

परसेसह टवाळखाेरांवर गुन्हा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गल्लीबोळात चार-पाच काडीमोडी पोरांना एकत्र करून, इन्स्टाग्रामवर रील्स टाकून स्वतःला हिराे समजणाऱ्या टवाळखोरांना नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) दणका दिला आहे. तडीपारी, एमडी ड्रग्ज तस्करी आणि गंभीर गुन्ह्यांचा इतिहास असलेल्या ऋषी परसे याच्यासह त्याच्या साथीदारांच्या मुजोरीचा फुगा पोलिसांनी (Police) फोडला आहे. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून दहशत पसरवणाऱ्या टोळक्याची लायकी कायद्याच्या (Law) चौकटीत समोर आली आहे.

- Advertisement -

शालिमार (Shalimar) येथील ​संदर्भ सेवा रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये काही कारणास्तव बेकायदेशीर जमाव जमवून, दंगा करत व्हिडिओ बनवणे आणि तो सोशल मीडियावर अपलोड करून जनतेत भीती पसरवल्याने भद्रकाली पोलिसांनी या तथाकथित ‘भाईं’ची मस्ती जिरवत भारतीय न्याय संहिता आणि फौजदारी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ऋषी बाबा परसे (रा. पंचवटी), दर्शन लोंढे (रा. सिडको अंबड), विशाल भालेराव (रा. उपनगर), सोनु कोंडा (रा. सातपूर), संजय रणधीर पवार (रा. महालक्ष्मी चाळ, भद्रकाली) आणि ‘baba_company’ या इन्स्टाग्राम अकाउंटच्या चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १६ ते ३४ वयोगटातील ही मुले कोणताही कामधंदा नसताना, चार टवाळखोरांना सोबत घेऊन चौका-चौकांत दादागिरी दाखवण्याचा आव आणतात. मात्र, प्रत्यक्षात ड्रग्ज तस्करी, तडीपारी यांसारख्या गुन्ह्यांत बरबटलेले हे संशयित समाजासाठी कीड ठरत आहेत. 

​’रील’च्या नादात थेट ‘जेल’चा रस्ता

सोशल मीडियावर रील्स आणि स्टोरीज (Social Media Reels and Story) टाकून ‘दहशत’ निर्माण करण्याचा आव आणणाऱ्या या टोळक्याची गल्लीतली ‘गिरी’ आता कायद्याच्या दणक्याने नामोहरम झाली आहे. अशा टवाळखोरांना समाजात कोणतीही प्रतिष्ठा नसून, कायदा आणि पोलिसांपुढे यांची खरी जागा कठड्यातच आहे. चौकात मुजोरी दाखवणाऱ्या या संशयितांना आता मान शरमेने खाली झुकवून पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडियावर अशा गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या आणि त्यांना पोसणाऱ्या गल्लीतील टवाळखोरांवरही पोलीस विशेष नजर ठेवून आहेत. 

संशयितांवर गंभीर कलमे

लागू करण्यात आलेले कलम: कृत्याचे स्वरुप: संभाव्य शिक्षा
बीएनएस कलम ३५३ (२) रील्स/व्हिडीओद्वारे समाजात भीती व दहशत पसरवणे:३ वर्षांपर्यंत कैद किंवा दंड
बीएनएस कलम ३५१ (२):गुन्हेगारी स्वरूपाची धमकी देणे,भीती दाखवणे:२ वर्षांपर्यंत कैद किंवा दंड
बीएनएस कलम ३५२:शांतता भंगाच्या हेतूने हुल्लडबाजी:२ वर्षांपर्यंत कैद किंवा दंड
बीएनएस कलम १८९ (२):बेकायदेशीर जमाव जमवणे: ६ महिन्यांपर्यंत कैद किंवा दंड
कलम ७: सार्वजनिक ठिकाणी दहशत, अडथळा निर्माण करणे:६ महिन्यांपर्यंत कैद/ बिगरजामीनपात्र

ताज्या बातम्या

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उडवली...

0
मुंबई | Mumbai एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटलांच्या सूचक...