Monday, July 27, 2026
Homeक्राईमNashik News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पापाचा बळी; खुटवडनगर भागातील घटना

Nashik News : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पापाचा बळी; खुटवडनगर भागातील घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील मोकाट श्वानांचा प्रश्न आता केवळ उपद्रवापुरता मर्यादित राहिला नसून, तो निष्पाप नागरिकांच्या जिवावर बेतू लागला आहे. सिडकोतील (Cidco) खुटवडनगर भागात (Khutvatnagar Area) भटक्या श्वानांनी (Dog) लचके तोडल्याने गंभीर जखमी झालेले ५१ वर्षीय लॉन्ड्री व्यावसायिक राजकुमार शंकर कनोजिया यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

- Advertisement -

नऊ दिवस मृत्यूशी (Death) झुंज देणाऱ्या कनोजिया यांच यांची शनिवारी पहाटे प्राणज्योत मालवली. मृत कनोजिया हे घरातील एकमेव कमावते होते. उपचाराचा मोठा खर्च सोसूनही अखेर त्यांचा जीव गेला; पालिकेच्या या निष्काळजीपणामुळे उद्ध्वस्त झालेल्या या गरीब कुटुंबाला आता आर्थिक भरपाई मिळणार का, असा आर्त सवाल उपस्थित होत आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC) श्वान निर्बिजीकरण मोहिमेच्या चिंधड्या उडाल्या असून प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. कनोजिया हे २५ तारखेला पहाटे पायी जात असताना मोकाट श्वानांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला.

गल्लीबोळातील हॉटेल वेस्ट, चिकन मटणचे टाकाऊ अवशेष आणि उघड्या कचरा कुंड्यांमुळे या हिंस्त्र टोळ्यांचे फिडिंग ग्राऊंड तयार झाले आहे. महापालिका दरवर्षी नसबंदीवर लाखो रुपयांचा निधी खर्च करत असल्याचा दावा करते, मात्र तरीही कुत्र्यांची संख्या आणि हिंस्त्रता वाढल्याने पालिकेच्या या मोहिमेवर आणि कंत्राटदारांवर संशय बळावला आहे.

नागरिकांचा संतप्त सवाल

पहाटे किंवा रात्री महिला, लहान मुले आणि वृद्धांनी घराबाहेर पडायचे कसे? तसेच, रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालणारे आणि त्यांचे हक्क मांडणारे अॅनिमल लव्हर्स, कुत्र्यांनी केलेल्या अशा जीवघेण्या हल्ल्यांची आणि एका निष्पापाच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी घेणार का? या गंभीर घटनेनंतर तरी महापालिका प्रशासन झोपेतून जागे होऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार, की आणखी एखाद्या निष्पापाच्या बळीची वाट पाहणार? असा संतप्त प्रश्न आता नाशिककर विचारत आहेत.

डेंजर झोन बनले सिडको

गेल्याच आठवड्यात जुने सिडको आणि आता खुटवडनगर येथे लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे हा परिसर आता डेंजर झोन बनला असून महिला व लहान मुलांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. यामुळे रात्री व पहाटे कामावर निघणारे दूध/वृत्तपत्र विक्रेते, कंपनी कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता ‘E20 इंधन’ लक्ष्य; आम आदमी पार्टी आक्रमक,...

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारच्या २० टक्के एथेनॉल...