Tuesday, September 8, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सिंहस्थापूर्वीच नाशिकमध्ये बोगस नागा साधूंचा सुळसुळाट; मिठाई व्यावसायिकाची...

Nashik Crime News : सिंहस्थापूर्वीच नाशिकमध्ये बोगस नागा साधूंचा सुळसुळाट; मिठाई व्यावसायिकाची अंगठी केली लंपास

पोलिसांनी भोंदूच्या मध्यप्रदेशातून आवळल्या मुसक्या

नाशिक | Nashik

आगामी २०२६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याची नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये (Nashik-Trimbakeshwar) जोरदार तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे भोंदू व बोगस साधूंचा सुळसुळाट वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ओझर परिसरात (Ozar Area) एका मिठाई व्यावसायिकाला संमोहित करून त्याच्या हातातील सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या दोन बोगस नागा साधूंच्या टोळीचा ओझर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथील भंडारा आणि पूजेच्या नावाखाली दक्षिणा मागण्यासाठी एक बोगस साधू ओझर येथील मिठाईच्या दुकानात (Sweet Shops) आला होता.गल्ल्यावर बसलेल्या दुकानदाराच्या हातातील सोन्याची अंगठी पाहताच त्याने हातचलाखी व संमोहनाचा वापर करून दुकानदाराला नकळत अंगठी काढून घेतली. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

४० सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मध्यप्रदेशात कारवाई

दुकानदाराच्या तक्रारीवरून ओझर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. तब्बल ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केल्यानंतर पोलिसांचे पथक मध्य प्रदेशातील खरगोन गावात पोहोचले. तेथून या दोन बोगस साधूंच्या (Fake Sadhu) मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा भोंदू आणि संशयित साधूंपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

३१ ऑक्टोबरपासून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात

दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६ साठी केंद्र आणि राज्य शासनाकडून सुमारे ३४ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहणाने या भव्य सोहळ्याचा प्रारंभ होणार असून, हा कुंभमेळा पुढील १८ महिने चालणार आहे. या संपूर्ण कालावधीत ३ मुख्य शाही स्नान आणि ४२ पर्व स्नानांचा समावेश असेल. त्यापैकी मुख्य शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहेत. गर्दीच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिसांचाही कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

मनोज

Manoj Jarange Patil: तुझ्या सात पिढ्या राजकारणात असल्या तरी मी जरांगे...

0
जालना | Jalanaमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता...