Thursday, March 13, 2025
Homeक्राईमNashik Crime News: चहा वाटपाच्या मजुरीच्या पैशातून वाद; पंचवटीतील 'त्या' हत्येचा झाला...

Nashik Crime News: चहा वाटपाच्या मजुरीच्या पैशातून वाद; पंचवटीतील ‘त्या’ हत्येचा झाला उलगडा

नाशिक | प्रतिनिधी
पंचवटीतील पेठफाटा येथील एसबीआय बँकेलगत बुधवारी (दि.१२) सकाळी संशयास्पद अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा बोथट हत्याराने डोक्यात प्रहार करून खून करण्यात आल्याचे उघड झाले होते. शवविच्छेदन अहवालात घटनेचा उलगडा झाल्यावर पंचवटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाच तासांत संशयिताला गजाआड केले आहे. संतोष रमेश अहिरे (३२, रा. एरंडवाडी, पेठफाटा) असे संशयिताचे नाव असून त्याने शांतीलाल बन्सी ब्राह्मणे (२९, रा. बोरगड, म्हसरूळ) या मित्राच्या डोक्यात दगड टाकून खून केला असे समोर आले. चहा वाटपाच्या मजुरीच्या पैशातून दोघांत मद्याच्या नशेत वाद झाले होते. त्यातून हा खून झाला.

पेठफाटचासमोरील गुलाब बागेसमोरील मोकळ्या जागेत बुधवारी सकाळी २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यातील संशयास्पद अवस्थेतील मृतदेह नागरिकांना दिसून आला होता. ही माहिती पोलिसांना कळवल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि गुन्हे शोध पथक दाखल झाले. पंचवटी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेज व तपासातून मृताचे नाव शांतीलाल ब्राह्मणे असल्याचे समोर आले.

- Advertisement -

दुसरीकडे, जिल्हा रुग्णालयातील फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. हेमंत घांगळे व डॉ. दिनेश पवार यांनी शवविच्छेदन केले असता त्यात ब्राह्मणेच्या डोक्याच्या मागील बाजूस मारेकऱ्याने दगड किंवा इतर बोथट वस्तूने प्रहार करून जबर जखम केल्याचे आढळून आले. सोबतच त्याला जबर मारहाण करण्यात आल्याने त्याच्या शरीरांतर्गत व बाहेर जखमा व व्रण आढळून आले होते. त्यानुसार आता पंचवटी पोलिसांनी या खूनप्रकरणाचा तपास करून अवघ्या पाच तासांत सीसीटीव्हीच्या आधारे अहिरेला ताब्यात घेत अटक केली. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनेने सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार प्रवीण वाघमारे, अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...