Thursday, June 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सातपूरला 'खरात फाईल्स'ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र...

Nashik Crime News : सातपूरला ‘खरात फाईल्स’ची पुनरावृत्ती! लैंगिक शोषण प्रकरणी रवींद्र एरंडेला बेड्या, पोलिसांच्या हाती लागले पन्नासपेक्षा जास्त ‘न्यूड’ व्हिडिओ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर परिसरात (Satpur Area) एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्वतःला गोरगरीब महिलांचा उद्धारकर्ता म्हणवून घेणाऱ्या एका प्रथितयश पत्रकाराचा खरा चेहरा उघड झाला असून, त्याच्याकडे कामाला असलेल्या ऑफिसबॉयनेच त्याच्या पापाचा घडा फोडला आहे. रवींद्र एरंडे (वय ६३) (Ravindra Erande) असे साप्ताहिक व यूट्यूब चॅनेलच्या पत्रकाराचे (Journalist) नाव असून, या घटनेमुळे प्रचंड सताप व्यक्त करण्यात येत आहे. खरात प्रकरणात राजकीय नेते, बडे अधिकारी सापडल्यानंतर आता पत्रकारितेच्या पवित्र पेशालाही यातून काळीमा फासला गेल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करून त्याचे चित्रीकरण करणाऱ्या या पत्रकाराचे पन्नासपेक्षा जास्त ‘न्यूड’ व्हिडिओ एका खंडणीकांडातून पोलिसांच्या हाती लागले असून, खरात फाईल्सच्या या पुनरावृत्तीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, एरंडे कामगारनगरी व श्रमिकनगरमध्ये लघुउद्योगांचा ‘कन्सल्टंट’ म्हणून मिरवायचा. लघुउद्योग सुरू करून देण्याच्या बहाण्याने त्याने सन २००३ पासून २०२४ पर्यंत अनेक गोरगरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केले आणि आपल्या सातपूर कॉलनी परिसरातील नीळकंठेश्वरनगरमधील कार्यालयाच्या के बिनमध्ये ‘कॅमेरा द्वारे छुपे चित्रीकरण केले.

हे अश्लील व्हिडिओ (Video) त्याने एका खासगी टॅब आणि हार्डडिस्कमध्ये थेट पीडित महिलांच्या नावे ‘फोल्डर’ करून साठविले. त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या आकाश बकरे या ऑफिसबॉयला आपल्या संपाद‌काच्या नीच कृत्याचा सुगावा लागला. त्याने संधी साधून केबिनमधून तो टॅब आणि हार्डडिस्क (दि. १) चोरली. पन्नासहून अधिक ‘न्यूड व्हिडिओ’ ताब्यात असल्याचे पाहून आकाशने तीन मित्रांच्या मदतीने त्याला धमकावण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी १२ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. भीतीपोटी त्याने सुरुवातीला १० हजार रुपये दिले.

मात्र, पैशांची (Money) मागणी वाढतच गेली. वारंवारच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने, पत्रकाराने २ एप्रिल २०२६ रोजी सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने स्वतः चे कृत्य लपवून फक्त ‘टॅब व हार्डडिस्क चोरी’ आणि ‘खंडणी’ची फिर्याद नोंदविली. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेली हार्डडिस्क आणि पेनड्राइव्ह आता विश्लेषणासाठी पाठवले आहेत. या अहवालानंतर मूळ फिर्यादी असलेल्या पत्रकारावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून, नाशिकमधील हे आतापर्यंतचे मोठे ‘डिजिटल सेक्स स्कँडल’ ठरण्याची चिन्हे आहेत.

पोलीस आयुक्तांचे निर्देश

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep karnik) आणि झोन दोनचे उपायुक्त किशोर काळे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाचे आदेश दिले. सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहिरे आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून संशयितांचा माग काढला. आडगाव शिवारातील दहावा मैल परिसरात ते लपल्याची माहिती मिळताच पथकाने गुरुवारी (दि. २) घेराव घातला. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित आकाश पुंडलिक बकरे (वय २८, रा. सातपूर), प्रकाश रामदास पानपाटील (वय २५, रा. सातपूर कॉलनी), सूरज सुनील गवई (वय २७, रा. सातपूर) व श्रीपत भीमराव शिंदे (वय ३८, रा. त्र्यंबकेश्वर) या संशयितांना पाठलाग करून पाच तासांत बेड्या ठोकल्या.

तपासात सापडले पन्नासहून अधिक व्हिडिओ

संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी हार्डडिस्क, २ पेनड्राइव्ह आणि मोबाईल जप्त केले. जेव्हा पोलिसांनी या साहित्याची तपासणी केली, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले. त्यामध्ये २००३ ते २०२४ या एकवीस वर्षांच्या कालावधीतील पन्नासहून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ सापडले. ‘खरात फाईल्स’ प्रमाणेच येथेही ऑफिसबॉयने मालकाचे काळ्या पत्रकारितेचे कर्तव्य चव्हाट्यावर आणल्याचे उघड झाले.

कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल?

पिडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मुलास सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून विविध हॉटेल्सवर नेऊन लैंगिक शोषण केले. तसेच एरंडे यांने अनेक महिलांसोबत शारीरीक संबंध प्रस्थापित करुन त्यांचे व्हिडीओ चित्रण केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४३०/२०२६ बी.एन.एस कलम ६९,७७, आय टी अॅक्ट कलम ६७(अ)) तसेच अॅट्रासिटी कायदा कलम ३(१) (डब्लू), ३(२) (व्ही), ३(२) (डब्लूव्ही) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलांनी न घाबरता पुढे यावे

हार्डडिस्कमधून पन्नासहून अधिक व्हिडिओ हस्तगत केले आहेत. ज्या महिला संशयिताच्या शोषणाला बळी पडल्या आहेत, त्यांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. पीडित महिलांची ओळख पोलीस पूर्णपणे गोपनीय ठेवतील. सखोल तपास सुरू असून, कडक कारवाई केली जाईल.

किशोर काळे, पोलीस उपायुक्त, झोन-२, नाशिक

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...