Monday, September 28, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सत्तर वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे...

Nashik Crime News : सत्तर वर्षीय वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान

वणी | वार्ताहर | Vani

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) लखमापूर येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद परिस्थितीत खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मंदाकिनी हरिभाऊ सोनवणे (वय ७०, रा. लखमापूर, ता. दिंडोरी) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी लखमापूर गावातील (Lakhmapur Village) घराजवळील परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात आरोपीने वृद्धेच्या तोंडावर कापड बांधून, तिचे हात-पाय दोरीने बांधले आणि तिला पाण्यात फेकून दिले.

दरम्यान, या अत्यंत निर्घृण कृत्यात मंदाकिनी सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेलके आणि सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. वृद्धेचा खून नेमक्या कोणत्या कारणातून (लुटमारीच्या उद्देशाने की जुन्या वैमनस्यातून) करण्यात आला? यामागे कोणाचा हात आहे? याचा शोध घेण्यासाठी वणी पोलिस विविध शक्यता तपासून पाहत आहेत.घटना घडल्यापासून लखमापूर परिसरात चिंतेचे वातावरण असून या निर्घृण हत्येतील आरोपीला तातडीने जेरबंद करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...