Thursday, June 4, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अबब! कसारा घाटाच्या पायथ्याशी मिळाले दोन कोटींचे घबाड

Nashik Crime News : अबब! कसारा घाटाच्या पायथ्याशी मिळाले दोन कोटींचे घबाड

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या पायथ्याशी पोलिसांची नाकाबंदी करून वाहन तपासणी सुरू असतांना या दरम्यान एका वाहनातून (Car) तब्बल २ कोटींचे घबाड मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी (Police) रोख रकमेसह वाहन ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Mahamarg) कसारा घाटातील (Kasara Ghat) चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी नाकाबंदी केली होती.यावेळी नाशिकहून मुंबईकडे जाणारी एमएच ११ बीव्ही ९७०८ या वाहनाची तपासणी केली असता त्यात २ कोटीची रक्कम आढळून आली.

हे देखील वाचा : Thackeray vs Shinde Shivsena : राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांत होणार मशाल-धनुष्यबाण थेट सामना

दरम्यान, पोलिसांनी अंदाजे दोन कोटीच्या (Two Crore) आसपास रक्कम व वाहन ताब्यात घेऊन भरारी पथकांकडून पैसे मोजण्याचे काम सुरू होते. तसेच दोन कोटीच्या आसपास ही रक्कम असल्याचा अंदाज असून उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी पोलीस अधिकारी सुनील बच्छाव व निवडणूक भरारी पथक व टीमकडून पुढील तपास सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : फुलेनगर गोळीबार प्रकरणातील ९ महिन्यांपासून फरार मुख्य...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati  फुलेनगर परिसरातील मुंजाबा चौकात झालेल्या दोन गटांतील दगडफेक आणि गोळीबार प्रकरणातील (Firing Case) मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात पंचवटी पोलिसांच्या...