Monday, June 24, 2024
Homeक्राईमखंडणीखाेर देवरे पुन्हा अटकेत

खंडणीखाेर देवरे पुन्हा अटकेत

नाशिक। प्रतिनिधी

- Advertisement -

अवैध सावकारी केल्यावर कर्जाची व्याजासह वसुली करणाऱ्या वैभव देवरेची (Vaibhav Devre) अडचण आणखीनच वाढली आहे. न्यायालयाने (Court) त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने इंदिरानगर पाेलीसांनी त्यास तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यामुळे आता त्याला पुढील काही दिवस काेठडीतील प्रसाद खावा लागणार आहे.

वैभव विरोधात खंडणी, विनयभंगासह महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार पाच गुन्हे दाखल आहेत. त्यातील तिसऱ्या गुन्ह्यात(दि. ४) वैभवला अटक केली. देवरे याचा जामीन अर्ज न्यायालयाने दोन दिवसांपुर्वी फेटाळून लावला होता. यामुळे त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अपिलात धाव घेतली होती. जिल्हा सत्र न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्या समाेर देवरेच्या अर्जावर सुनावणी झाली. शनिवारी (दि.४) सत्र न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळून लावला. इंदिरानगर पोलीस ठाण्यात पाच कर्जदारांनी दिलेल्या फिर्यादींवरून फसवणुक व विनयभंगाचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. (Nashik Crime News)

दरम्यान एका कर्जदार महिला फिर्यादीसोबत मोबाइलवरून शिवीगाळ करत विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तसेच विनापरवाना कर्ज वाटप करत सावकारी करून कर्जदारांकडून मुद्दल व व्याजाच्या रकमेची बळजबरीने वसूली करत मालमत्ता हडपल्याचा आरोप आहे. तर, दुसऱ्या फसवणूकीच्या गुन्ह्यात पोलिसांना अद्याप ६ लाख रूपयांची वसूली करावयाची असल्याचा युक्तीवाद सरकारपक्षाकडून न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे देवरे याने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

सत्र न्यायालय क्रमांक३मध्ये या अर्जावर शुक्रवारी सुनावणी पुर्ण झाली. न्यायालयाने शनिवारी याबाबत आदेश देत जामीन अर्ज फेटाळला. इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी उपनिरीक्षक भूषण सोनार यांयह सागर परदेशी, योगेश जाधव यांच्या पथकाला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवाना केले. पथकाने तेथून देवरे याचा ताबा घेत इंदिरानगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याला तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या