Friday, October 2, 2026
Homeक्राईमNashik Crime News : अत्याचारप्रकरणी रास्ता रोको; खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीच्या...

Nashik Crime News : अत्याचारप्रकरणी रास्ता रोको; खटला जलदगती न्यायालयात चालवून फाशीच्या शिक्षेची मागणी

नाशिक। प्रतिनिधी | Nashik

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यावर दाखल तक्रार मागे घेण्यासाठी तिच्या आजीचे अपहरण आणि हत्या केल्याच्या आराेपाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे पडसाद साेमवारी नाशिक जिल्हा रुग्णालयासमाेर (Nashik Civil Hospital) उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पीडितेच्या कुटुंबासह कुंभार समाज बांधवांनी सोमवारी (दि. १०) नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर आक्रमक होत रस्ता रोको आंदोलन केले.

- Advertisement -

सहा दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याचा दावा आंदाेलनकर्त्यांसह पीडितेच्या कुटुंबाने यावेळी केला. याप्रकरणात संशयितांविरुद्ध दाखल तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आंदाेलनकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी पीडितेच्या आजीचे अपहरण करून, हात-पाय बांधून तिला विहिरीत फेकून खून केल्याचा आरोप कुंभार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नवयुवक कुंभार समाज विकास संस्थेचे निलेश राऊत यांनी याबाबत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली असून पाेक्सो कायदा, अपहरण व खुनाच्या गुन्ह्याअंतर्गत सर्व पसार संशयितांना तत्काळ अटक (Arrested) करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी उपविभागीय पाेलीस अधिकारी कांतीलाल पाटील, वावीचे पाेलीस निरीक्षक आशिष शेळके व सरकारवाडा पाेलिसांनी आंदाेलनकर्त्यांची समजूत काढली. दरम्यान, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत आरोपींना कस्टडीत घेतले जात नाही, तोपर्यंत आजीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या घटनेमुळे त्र्यंबकराेडवर (Trimbak Road) अचानक धावपळ उडाली. सरकारवाडा पाेलिसांनी (Sarkarwada Police) धाव घेत पुढील कार्यवाही केली.

ताज्या बातम्या

भीषण अपघात! अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

0
मुंबई । Mumbai अहिल्यानगर-पाथर्डी या राष्ट्रीय महामार्गावर माळी बाभुळगाव शिवारात गुरुवारी सायंकाळी एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. एका सुसाट अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत...