Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : माेटारमनच्या केबिनमध्ये रिल'गिरी'; दाेन घुसखाेर तरुणांना आरपीएफकडून अटक

Nashik Crime News : माेटारमनच्या केबिनमध्ये रिल’गिरी’; दाेन घुसखाेर तरुणांना आरपीएफकडून अटक

नाशिकराेड | प्रतिनिधी | Nashik Road

- Advertisement -

लोकल ट्रेनमधील मोटरमनच्या केबिनमध्ये ‘इन्स्टा रिल’ तयार करण्यासाठी घुसखोरी करणाऱ्या दोन तरुणांना (Youth) रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अटक (Arrested) केली. हे दोघे तरुण नाशिकचे (Nashik) आहेत. कसारा स्थानकावर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या केबिनमध्ये या दोन युवकांनी घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : इव्हेंटच्या कामासाठी आलेल्या युवकाचा पडल्यामुळे मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, राजा हिम्मत येरवाल (२०) आणि रितेश हिरालाल जाधव (१८, दोघे रा. नाशिक) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. २७ जुलै राेजी कसारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या (क्र. ९५४१०) मोटरमनच्या (Moterman) केबिनमध्ये एकाने प्रवेश केला आणि दुसऱ्या संशयिताने व्हिडिओ शूट केला. तो सोशल मीडियावर अपलोडही केला होता.

हे देखील वाचा : Nashik Crime News : मेडिकल चालक महिलेची पाेत ओरबाडली

आरपीएफने (RPF) सायबर सेलच्या सहकार्याने या दोघांना नाशिक येथून ८ ऑगस्टला पकडले. चौकशी दरम्यान या दोघांनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची कबुली दिली.  त्यानंतर त्यांना रेल्वे मालमत्ता व संरक्षण कायद्यान्वये विविध कलमे दाखल करुन दाेघांना अटक करण्यात आली. प्रवाशाची सुरक्षा अबाधित रहावी, अतिक्रमण आणि अनधिकृत प्रवेशाबाबत मध्य रेल्वेने शून्य-सहिष्णुतेचे धोरण स्वीकारले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतक्या’ लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज मंजूर

अलीकडेच अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. गुलजार शेख याला रेल्वे सुरक्षा दलाने व्हिडिओ बनवण्यासाठी रेल्वे रुळांशी छेडछाड केल्याप्रकरणी अटक केली होती. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणणारी, रेल्वेच्या कामकाजात अडथळा आणणारी आणि रेल्वे कायदे आणि नियमांचे उल्लंघन करणारी अशी कृत्ये करू नये, असे आवाहन रेल्वेने केले आहे. 

हे देखील वाचा : Nashik News : ‘लाडका भाऊ’साठी ४ हजारांवर युवकांची नोंदणी

तर, थेट संपर्क करा

रेल्वेच्या आवारात कोणीही असे कृत्य करत असल्यास 9004410735 किंवा 139 या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. प्रवाशांच्या सुरक्षिततेला भारतीय रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि प्रवासी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहेत, असे रेल्वेने म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या