Wednesday, December 4, 2024
HomeUncategorizedNashik News : जिल्ह्यात २५ दिवसांत तब्बल 'इतकी' लिटर दारू जप्त

Nashik News : जिल्ह्यात २५ दिवसांत तब्बल ‘इतकी’ लिटर दारू जप्त

भरारी पथकाची कारवाई,अडीच कोटींचे दागिनेही हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) जाहीर झाल्यापासून प्रचारात रंगत आली आहे. कार्यकर्ते आणि कामगारांना सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनासह मद्याची (Alcohol) वाहतूक होते आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यात नाकाबंदीसह भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली असून त्याद्वारे २५ दिवसांत तब्बल अडीच लाख लीटर दारू जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिक मध्यत हिंदुत्ववादाचाच विजय होणार; आमदार देवयानी फरांदे यांचा विश्वास

विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यापासून २५ दिवसांत विविध यंत्रणांनी जिल्ह्यातून (District) रोख रक्कम, दारू, ड्रग्ज, मौल्यवान वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त केल्या. मतदानाला अजून ११ दिवस बाकी असून या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण जप्तीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रक्कम नाशिक मध्य मतदारसंघातून (Nashik Central Constituency) जप्त करण्यात आली असून १ कोटी १४ लाखांचे दागिनेही याच मतदारसंघातून जप्त करण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : विल्हाेळीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नाशिक शाखेतर्फे नुकतीच २५ दिवसांत जप्त केलेल्या रकमेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ८ कोटी २९ लाख रुपयांच्या जप्तीपैकी ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा वाटा सुमारे ३० टक्के राहिला आहे. त्यानंतर मौल्यवान वस्तू २० टक्के मिळाल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या. एजन्सींनी १ कोटी ७७ लाख रुपयांची रोकड आणि २ कोटी ३५ लाख रुपयांची सुमारे २ कोटी लिटर दारूही जप्त केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या