Monday, October 5, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : विशेष खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग; पेन ड्राईव्ह, दस्तऐवज,...

Nashik TCS Case : विशेष खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग; पेन ड्राईव्ह, दस्तऐवज, मुद्देमाल हस्तांतरित करण्याचे आदेश 

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात (Deolali Camp Police Station) मार्च २०२६ मध्ये दाखल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील विनयभंग, धर्मांतराचा प्रयत्न व अॅट्राेसिटीच्या गंभीर गुन्ह्यातील विशेष केस क्र. ५५/२०२६ ची सुनावणीला आता जिल्हा न्यायालय-१० तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नाशिक यांच्या न्यायालयात (Court) होणार असून, इतर सत्र खटल्यांसोबत याही खटल्याची एकत्रित सुनावणी चालणार आहे. 

- Advertisement -

नाशिकचे (Nashik) मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या २९ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. ​त्यानुसार,या केसशी संबंधित सर्व मूळ दस्तऐवज, पेन ड्राईव्ह आणि इतर सर्व जप्त मुद्देमाल विशेष संदेशवाहकाद्वारे जिल्हा न्यायालयात पाठवण्यात यावा. तसेच सीआयएस. प्रणालीमध्ये हे प्रकरण वर्ग झाल्याचे नोंद घेण्याचे निर्देश न्यायालयाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहेत.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १५६/२०२६ नुसार संशयित निदा एजाज खान, दानिश एजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार या तिघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात भारतीय न्याय संहिता, अॅट्राेसिटी अॅक्ट व भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हेगारी कट रचणे, बलात्कार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे आदीचा समावेश आहे. आता हा खटला इतर सात प्रमुख सत्र खटल्यांसोबत जोडल्यामुळे या प्रकरणातील तांत्रिक आणि डिजिटल पुरावे एकाच न्यायालयात सादर होऊन एकत्रित सुनावणी होईल. यामुळे डिजिटल पुराव्यांची तपासणी आणि साक्षीदारांची साक्ष एकाच टप्प्यात पूर्ण होण्यास मदत होणार असून, प्रकरणातील गुंतागुंत उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीतून राम शिंदे यांची माघार

0
अहिल्यानगर । प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम...