Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik News : अखेर 'त्या' स्वच्छतागृह कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik News : अखेर ‘त्या’ स्वच्छतागृह कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मद्यपि तरुणाने (Drunken Youth) ‘हॅप्पी होळी’ म्हणत थेट सुलभच्या कामगारास पेटवून (Burning) दिल्याची खळबळजनक घटना ठक्कर बाजार बसस्थानकात शुक्रवार (दि.२१) रोजी घडली होती. यात बस स्थानकाच्या स्वच्छतागृहातील विजय गहलोत (वय ५४, रा. देवळाली कॅम्प) हे साठ टक्के भाजले होते. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) उपचार सुरू होते. मात्र, आता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

शुभम सतीश जगताप (२२, रा. खाकी आखाडा, नाकचौक, पंचवटी) असे गेहलोत यांना पेटवून देणाऱ्याचे नाव असून त्याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही अटक (Arrested) करुन गजाआड केले आहे. दरम्यान, आरोपीला (Accused) कोणीही नातलग नसल्याने तो ठक्कर बाजार परिसरातील एका खोलीजवळ रात्री मुक्काम करायचा. दिवसभर परिसरातील हॉटेलात किंवा इतरत्र किरकोळ कामे करुन त्याचा उदरनिर्वाह सुरू आहे. संशयिताचे व गेहलोत याचे कोणत्यातरी कारणातून कायम वाद व्हायचे. त्या रागातून (Anger) जगताप याने गेहलोत यांना पेटवून दिले.

त्याने दिली कबुली

दरम्यान, निशा विजय गहलोत यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने शुभमला इदगाह मैदान येथून ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, ‘मी सुलभ शौचालयाच्या बाजुला असणाऱ्या मीटर बॉक्सच्या रूममध्ये राहत होतो. तेथे काही दिवसांपासून मला विजय गेहलोत चेष्टा मस्करी करीत, मारहाण करीत होता. मला त्याठिकाणी राहण्यास मज्जाव करून हाकलून देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...